Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: शेतीवर आधारीत उद्योजकता विकास प्रशिक्षण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन श्रावण कुमार - प्रतिनिधी चंद्रपूर - महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र चंद्रपूरद्वारे 10 वी पास व 18 वर्षे प...

  • युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन
श्रावण कुमार - प्रतिनिधी
चंद्रपूर -

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र चंद्रपूरद्वारे 10 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक युवतीकरीता12 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2020 या  कालावधीमध्ये ऑनलाईन शेतीवर आधारीत उद्योग, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. तरी युवक युवतींनी सदर प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी के.व्ही. राठोड यांनी केले आहे.

सदर कार्यशाळेत ऑनलाईन शेतीवर आधारीत विविध उद्योगसंधी,अन्न प्रक्रियावर आधारीत उद्योगसंधी डिजीटल मार्केटिंग, ॲग्रीकल्चर प्रॉडक्ट पॅकेजिंग, दुग्ध व्यवसाय व दुग्ध प्रक्रिया उद्योगातील उद्योगसंधी, फळ प्रक्रियातील उद्योगसंधी, पशुसंवर्धवर आधारीत उद्योगसंधी, उद्योजकता व उद्योजकीय प्रेरणा प्रशिक्षण, शासकीय कार्यालयातील विविध योजना, उत्पादक निवड, उद्योगासाठी लागणारे परवाने नाहरकत प्रमाणपत्र व नोंदणी, जीएसटी नोंदणी, विपणन व्यवस्थापन उत्पादन व कच्चा माल यांचे व्यवस्थापन, ऑनलाईन कर्ज प्रक्रीया व कृती आराखडा तयार करुन अंमलबजावणी  करणे  इत्यादी विषयांवर ऑनलाईनद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक युवतीनी www.mced.co.in या वेबसाईटवर 11 ऑक्टोबर 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी  प्रकल्प अधिकारी के व्ही. राठोड, मो.न. 9403078773, 07172-274416 व  कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे,  मो. न. 9011667717 या क्रमांकावर संपर्क साधावा. 













About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top