Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: हनुमान जयंतीच्या दिवशी 14 वर्षीय मुलाचे अपहरण, नंतर हत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पोलिसांची कारवाई; तीन तरुणांच्या अटकेने प्रकरण उघड आमचा विदर्भ - नागपुर (दि. ०६ एप्रिल २०२६) –         नागपुरातील गिट्टीखदान परिसरात घडलेल्य...
पोलिसांची कारवाई; तीन तरुणांच्या अटकेने प्रकरण उघड
आमचा विदर्भ -
नागपुर (दि. ०६ एप्रिल २०२६) –
        नागपुरातील गिट्टीखदान परिसरात घडलेल्या 14 वर्षीय अथर्व नानोरे हत्याकांडाचा अखेर उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी गिट्टीखदान पोलीस आणि क्राइम ब्रांचच्या संयुक्त पथकाने तीन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे जयराम गोपाल यादव (वय 19), केतन उर्फ कुणाल रमेश साहू (वय 22) आणि आयुष मोहन साहू (वय 19) अशी आहेत. पोलिसांनी 72 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या तिघांना ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अथर्वचे वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. आरोपी नियमितपणे त्यांच्याकडून भाजी खरेदी करत होते आणि त्यांच्यावर काही प्रमाणात उधारीही होती. तसेच अथर्वच्या वडिलांकडे नेहमी रोख रक्कम असते, याची माहिती आरोपींना होती. या लोभातून त्यांनी तीन दिवस आधी अपहरणाची साजिश रचली.

        योजनेनुसार अथर्वला फसवून नेण्याची जबाबदारी जयराम यादव याच्यावर सोपवण्यात आली होती. घटनेच्या दिवशी हनुमान जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान अथर्व आईस्क्रीम घेण्यासाठी घराबाहेर पडला असता जयरामने त्याला बहाणा करून एका टाटा ऐस वाहनाजवळ नेले. त्या ठिकाणी आधीच आयुष साहू आणि कुणाल साहू उपस्थित होते. त्यानंतर तिघांनी जबरदस्तीने अथर्वला वाहनात बसवले आणि आवाज करू नये म्हणून त्याच्या तोंडात कापड कोंबले. आरोपी त्याला गोरेवाडा परिसराकडे घेऊन गेले. मात्र परिसरातील गोंधळामुळे घाबरून त्यांनी कापडाने गळा आवळून अथर्वची हत्या केली. हत्यानंतर आरोपींनी मृतदेह कालमेश्वर रेल्वे क्रॉसिंग फ्लायओव्हरजवळ फेकून दिला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी वापरलेले वाहन स्वच्छ धुऊन टाकले आणि घटनास्थळावरून फरार झाले.

        दरम्यान, अथर्व बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासादरम्यान एक टाटा ऐस वाहन संशयास्पदरीत्या घटनास्थळाच्या दिशेने जाताना दिसून आले. याच धाग्यावरून पोलिसांनी आयुष साहू याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर उर्वरित दोन्ही आरोपींनाही अटक करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई गिट्टीखदान पोलीस आणि क्राइम ब्रांचच्या संयुक्त पथकाने पार पाडली असून या घटनेमुळे नागपूर शहरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

#NagpurNews #CrimeNews #AtharvaNanore #NagpurCrime #BreakingNews #PoliceInvestigation #CCTVFootage #Justice #IndiaNews #Gittikhadan #CrimeAlert #PublicSafety #LatestNews #MaharashtraNews #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

Next
This is the most recent post.
Previous
थोडे जुने पोस्ट

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top