आमचा विदर्भ -
विरूर (स्टे.) (दि. ०६ एप्रिल २०२६) –
महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विरूर स्टेशन येथे सामाजिक सलोखा आणि जनजागृतीचा संदेश देणारा “फुले-आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे. नवयुवक बौद्ध समाज मंडळ व पंचशील महिला मंडळ विरूर स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव दि. ११ ते १६ एप्रिल २०२६ दरम्यान पार पडणार आहे. या महोत्सवाची विशेष बाब म्हणजे “डिजे मुक्त उत्सव” ही संकल्पना राबवण्यात येत आहे. ध्वनीप्रदूषण टाळून शांतता, बंधुता आणि सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश या माध्यमातून दिला जात आहे. सध्याच्या काळात वाढत्या ध्वनीप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम समाजासाठी आदर्श ठरत आहे.
महापुरुष महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित हा महोत्सव समाजप्रबोधन, शिक्षण आणि सांस्कृतिक जाणीव वाढवण्याचे कार्य करणार आहे. या कार्यक्रमासाठी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. शंभरकर, प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषाताई गावतुरे, गोंडवाना विद्यापीठाचे प्राध्यापक व जेएनयू विद्यार्थी प्रा. सुरडकर तसेच परिसरातील मार्गदर्शक बळीराज निकोडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. महोत्सवात विविध सामाजिक उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष आकर्षण म्हणून “माता रमाई बोलते” या एकपात्री नाट्याचे सादरीकरण गायत्रीताई रामटेके यांच्याकडून होणार आहे. तसेच प्रबोधनात्मक संगीत कार्यक्रमासाठी गायक प्रकाशनाथ पाटणकर यांची उपस्थिती राहणार आहे.
या महोत्सवाचा मुख्य उद्देश समाजात एकता, समता आणि बंधुता वाढवणे हा असून, डिजे मुक्त उपक्रमातून शांततामय आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्थानिक नागरिक, युवक आणि महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग या उपक्रमाला लाभत असून, हा महोत्सव सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी एक आदर्श उपक्रम ठरत आहे.
#PhuleAmbedkar #DJFreeFestival #SocialHarmony #Virur #Chandrapur #AmbedkarJayanti #PhuleJayanti #CulturalFestival #PeacefulCelebration #CommunityEvent #MaharashtraNews #YouthPower #WomenEmpowerment #PositiveNews #SocialAwareness #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.