
file photo
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा वनपरिक्षेत्र, राजुरा व विरूर (स्टे.) अंतर्गातील गावांमध्ये नरभक्षक वाघाने धुमाकुळ घातला असून मागील वर्षाभरात १० शेतकऱ्यांना नाहक प्राण गमवावा लागला. या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी, शेतमजूर समन्वय समितीने वन प्रशासनाला दिला आहे.
उपविभागीय वनअधिकारी यांना निवेदन देऊन हा इशारा देण्यात आला असून यावेळी समितीचे सदस्य चेतन जयपूरकर, मल्लेश आत्राम, भाग्यश्री आत्राम, निलेश राऊत, सुभाष साळवे, चारणदास तोडासे, शंकर धनवलकर आदी उपस्थित होते.
टेंबूरवाही, सिर्सी, खांबाळा, तुलाना, नवेगांव. सोनुली, केळझर, चिंचोली, कविठपेठ, धानोरा, सिंधी, नलफडी व विहीरगाव भागातील शेतकऱ्यांना शेतात जाणे व शेतीचे काम करणे अत्यंत जिकरीचे झाले आहे. परिसरात १६ जानेवारी, २०१९ पासून आजपर्यंत २२ महिण्याच्या कालावधीत अनेक शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले असून अनेक शेतकरी वाघाच्या हल्यात गंभीर जखमी झाले. काही शेतकऱ्यांना तर कायमचे दिव्यांगत्व आले आहे. वाघाच्या भितीने अन्य वन्य प्राण्यांचा गावालगतच्या शेतात संचार वाढला असल्याने शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होत असून शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे.
यामुळे वन विभागानी नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा अन्यथा शेतकन्यांकडून वन विभागाच्या कार्यालयासमोरील मुख्य मार्गावर दिनांक १२ ऑक्टोंबर ला लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून करण्यात आला आहे












टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.