Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सिंदेवाही - वाघांच्या हल्यात इसम गंभीर जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी सिंदेवाही - सिंदेवाही वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या मरेगाव बिटातील कक्ष क्रमांक १४१२ खैरी (चक) गटातील २९०...

मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
सिंदेवाही -
सिंदेवाही वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या मरेगाव बिटातील कक्ष क्रमांक १४१२ खैरी (चक) गटातील २९० मधील बोंडकू सुरपाम यांच्या शेताजवळ गुरेढोरे चारत असताना दब्बा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने विक्रम जानबा आदे वय ४७,गुंजेवाही (बेघर) याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. त्याच्या डोक्याला, डाव्या हाताला व डाव्या पायाला जखम झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे उपक्षेत्र अधिकारी कुळमेथे,उपक्षेत्र अधिकारी रासेकर, वनरक्षक गेडाम, वनरक्षक राठोड यांनी वरिष्ठ अधिकारी यांना दूरध्वनी वरुन घडलेली माहिती देऊन संबंधित जखमी इसमाला प्रथमोपचार करण्यासाठी गुंजेवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार करून त्याला सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले. पुढील तपास वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण गोंड हे करीत आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top