Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बेरोजगार युवकांकरीता दरवर्षी २ कोटी रोजगार निर्मिती करा - चेतन गेडाम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बल्लारपूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतन गेडाम यांची मागणी रमेश निषाद - प्रतिनिधी बल्लारपुर - केंद्र सरकार ने युवकांसाठी वर्षाला 2 कोटी रोजगार...

  • बल्लारपूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतन गेडाम यांची मागणी
रमेश निषाद - प्रतिनिधी
बल्लारपुर -
केंद्र सरकार ने युवकांसाठी वर्षाला 2 कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन दिले होते. पण ते देण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरली आहे. बेरोजगार युवकांकरीता दरवर्षी २ कोटी रोजगार निर्मिती करण्याची मागणी बल्लारपूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतन गेडाम यांनी केली आहे. 

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटी, माजी खासदार नरेश पुगलिया व युवा नेते करण पुगलिया यांच्या मार्गदर्शनाथ युवक काँग्रेस अध्यक्ष चेतन गेडाम यांनी बल्लारपुर तहसीलदार मार्फत मा. राष्ट्रपती यांना निवेदन पाठवून हि मागणी केली आहे. 

नोटबंदीमुळे भारतात सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणाऱ्या कृषी व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला. त्यामुळे कोट्यावधी लोकांचा रोजगार बुडाला. वस्तू सेवा कर (GST) चुकीच्या अंमलबजावणीमूळे कुटीर-लघु-मध्यम क्षेत्राचे आणि उद्योगधंदयांचे पार कंबरडे मोडले गेले. याचा परिणाम म्हणजे  बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. सरकारच्या भारतीय सांख्यीकी आयोगाच्या (NSC) अहवालानुसार देशात 2017-18 या वर्षात बेरोजगारीचा दर 6.1 टक्के असुन ग्रामीण भागातला बेरोजगारीचा दर 5.3 टक्के होता तर शहरी भागात 7.8 टक्के राहिला. तरुणांमध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक, म्हणजे 13 ते 27 टक्क्यांवर पोहोचला होता.

यानंतर कोरोनामुळे काहीही नियोजन न करता लादलेल्या लॉकडाऊनमुळे 12 ते 13 करोड लोक बेरोजगार झाले असल्याचे CMIE च्या पाहणीतून समोर आले आहे. तेवढ्याच कुटुंबांचे जगणे रोजगाराविना मुश्किल झाले आहे. केंद्र शासनाचा चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली असून नुकतेच भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचा दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून -२३.९ टक्क्यांनी आक्रसल्याचे समोर आले आहे. 

केंद्र शासनाने 20 लाख करोडच्या पॅकेजमधून बेरोजगार युवक, शेतकरी वा लघु-मध्यम उद्यगक्षेत्र, यापैकी कोणत्याही घटकास मदत झाली नाही. म्हणून. मा. राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात येत असल्याचे चेतन गेडाम यांनी सांगितले. यावेळी युवक काँग्रेस उपाध्यक्ष सिकंदर खान, महासचिव शंकर महाकाली, तालुका अध्यक्ष अज़हर शेख, शहर उपाध्यक्ष सोहेल खान, NSUI महासचिव संदीप नक्षिणे, शहर सचिव विशाल बोकड़े, शैलेश लांजेवार, काशी मेगनवार, राहुल ननकट, श्रीकांत गुजरकर, रोशन ढेगड़े, समीर खान व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top