Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सास्ती येथील वारंवार खंडित होणार्‍या वीज पुरवठा सुरळीत करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
उलगुलान संघटना शाखा सास्ती च्या वतीने कनिष्ठ अभियंता यांना निवेदन अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी राजुरा - मागील अंदाजे पाच ते सहा महिन्यापास...

  • उलगुलान संघटना शाखा सास्ती च्या वतीने कनिष्ठ अभियंता यांना निवेदन

अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
मागील अंदाजे पाच ते सहा महिन्यापासुन सास्ती गावातील विज पुरवठा वारंवार रात्रभर तर कधीकधी संपूर्ण दिवसभर कोणतेही कारण नसताना खंडित होत असतो. ऑनलाईन शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करतांना अडचणीला समोर जावे लागत असून, सतत आठ ते बारा तास विज खंडित असने हे नित्याचेच झाले असुन सदर प्रकारामुळे गावकऱ्यांना नाहक त्रासाला सामोर जावे लागत आहे. लाकडाऊन मुळे व्यापारी, व्यवसायिक वर्ग शेतकरी व सर्वसामान्य नागरिक पुर्वीच त्रस्त असतांना विज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे गावकरी व व्यापारी वर्गात प्रचंड प्रमाणात रोष आहे. सास्ती येथे नियुक्त लाईनमॅन मुख्यालयी न राहता बाहेरून ये जा करीत असुन ड्युटीवर असतांना सतत दारूच्या नशेत असतो असे निदर्शनास आले आहे. 

तरी या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेऊन विज पुरवठा सुरळीत चालू राहील याची  तात्काळ व्यवस्था करण्यात यावी अन्यथा विज वितरण कंपनी प्रशासना विरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा उलगुलान संघटनेच्या वतीने देण्यात आला.

निवेदन देताना उलगुलान संघटनेचे पदाधिकारी पुरूषोत्तम नळे, तेजराज कुबळे, अश्विन माऊलीकर, श्रीधर रावला, राजू काटम, इंद्रदास मेश्राम, साहिल झाडे तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top