झुकलेली झाडे तात्काळ तोडावीत - शेतकरी संघटनेची मागणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
जिवती (दि. २९ ऑगस्ट २०२५) -
जिवती ते शेणगाव रोडवरील घाट भागात दरड कोसळून मोठे झाड रस्त्यावर पडले असून, या घाटावर दरड कोसळण्याची व झाडे पडण्याची मालिका गेल्या आठवडाभरापासून सुरू आहे. या घटनेमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्यात हा घाट अधिक धोकादायक ठरत असून, प्रशासन याबाबत निष्क्रीय आहे का, हा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
काही दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेचे नेते सुदाम राठोड यांच्या नेतृत्वात वनविभाग जिवती यांना जिवती तालुक्यातील सर्व घाटावरील झुकलेली झाडे तोडून विलेवाट लावण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. मात्र अद्यापही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना झालेली नाही.
सुदाम राठोड यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, “जर दोन दिवसांत सर्व घाटावरील झुकलेली झाडे कापून घाट मार्ग मोकळा करण्यात आला नाही, तर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी आंदोलन करेल.” स्थानिक नागरिक व प्रवाश्यांनी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन घाटावरील झाडे व दरडी हटवून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी केली आहे.
#JivatiLandslide #RoadSafety #FarmersUnion #TreeFallDanger #PublicSafetyFirst #JivatiGhats #HeavyRainImpact #SaveLivesNotWait #AdministrationAlert #CitizenSafety #shetkarisanghtna #sudamrathod #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.