हंसराज अहीर यांच्या पुढाकाराने प्रकल्पग्रस्तांसाठी सकारात्मक घडामोडी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर/नागपूर/यवतमाळ (दि. २९ ऑगस्ट २०२५) -
वेकोलि प्रकल्पग्रस्त शेतकरी व युवकांच्या न्याय्य मागण्या आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली 25 ऑगस्ट रोजी नागपूर येथील वेकोलि मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस वेकोलिचे सीएमडी जय प्रकाश द्विवेदी, निदेशक मानव संसाधन डॉ. हेमंत पांडे, विविध विभाग प्रमुख, ओबीसी व अन्य प्रवर्गातील प्रकल्पग्रस्त बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत कोल इंडिया कोलकाता येथे 10 जुलै रोजी झालेल्या चर्चेतील निर्णयांचे कार्यान्वयन, जमिनींच्या अधिग्रहणाचा प्रश्न, प्रकल्पग्रस्तांना आर्थिक मोबदला व नोकऱ्या, तसेच कंत्राटी कामगारांना एचपीसीनुसार वेतन यासंबंधी विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली.
महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे:
- वेकोलितील उच्च पदांसाठी केवळ अर्हताप्राप्त उमेदवारांनाच संधी दिली जाईल.
- प्रकल्पग्रस्त युवकांसाठी वॉल्वो ट्रेनिंग सेंटर लवकरच सुरू केले जाईल.
- डिप्लोमा/डिग्री व उच्च शिक्षण घेतलेल्यांना सुरक्षारक्षक पद अनिवार्य न ठेवता ऐच्छिक केले जाईल.
- उच्च शिक्षित कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठीची पात्रता 3 वर्षांवरून 1 वर्ष करण्यात आली.
- वेकोलि अधिनस्थ सर्व ओबी कंपन्यांनी एचपीसीनुसार वेतन देणे बंधनकारक केले.
- स्थानिकांना किमान 80 टक्के रोजगार देण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सूचना करण्यात येतील.
बैठकीत जमीन अधिग्रहणाच्या मोबदल्याबाबत ‘एकरमागे नोकरीसह आर्थिक लाभ’ किंवा ‘एकमुश्त 30 लाख रुपये प्रति एकर’ हे दोन पर्याय निश्चित करण्यात आले. जमिनीचा ओलीत दर्जा ठरवताना केवळ सॅटेलाईट सर्व्हे न बघता मोटर पंपचे लाईटबिल व सातबारा नोंदींचा आधार घेण्याचे ठरले. न्यायालयीन प्रलंबित खटल्यांमुळे मोबदला व नोकऱ्या थांबवू नयेत, असेही निर्देश देण्यात आले. या बैठकीस मधुकर नरड, राजु घरोटे, पवन एकरे, अंकुश आगलावे, धनंजय पिंपळशेंडे, शेख जुम्मन रिझवी, पुरूषोत्तम लांडे, कल्पनाताई टोंगे, अतुल बोंडे, केशव पिदुरकर, लोहे यांचेसह प्रकल्पग्रस्त बांधव उपस्थित होते.
#WCLDecisions #BackwardClassesCommission #LandAcquisitionJustice #WCLJobs #SkillDevelopment #VolvoTrainingCenter #HPCWages #LocalEmployment #ProjectAffectedRights #NagpurMeeting #hansrajahir #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.