पोलिसांची युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
वणी (दि. 27 ऑगस्ट) –
वणी शहरातील जैन ले-आऊट येथील प्रणय संजय गोखरे (वय 23) या युवकाने वर्धा नदीच्या पाटाळा पुलावरून नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
प्रणय गोखरे यांची मोटारसायकल पुलावर उभी आढळून आली. महामार्गावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये तो सकाळी सुमारे 10 वाजता पुलावर येऊन नदीत उडी घेताना दिसला.
घटनेची माहिती मिळताच वणी पोलिस ठाण्याचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पथकाने नदी पात्रात शोधकार्य सुरू केले. मात्र, वर्धा नदीचा प्रचंड वाढलेला पाण्याचा प्रवाह आणि जोरदार वेगामुळे शोधकार्य कठीण ठरत आहे. वृत लिहीपर्यंत युद्ध पातळीवर शोधमोहीम सुरू होती.
#WaniNews #WardhaRiver #YouthMissing #BreakingNews #PoliceSearch #WaniUpdate #WardhaUpdate #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.