भद्रावतीतल्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २५ जुलै २०२५) -
भद्रावती शहरातील सुरक्षा नगर भागात काही दिवसांपूर्वी घडलेल्या धाडसी घरफोडी प्रकरणातील आरोपी प्रमोद उर्फ मोबाईल अरुण गेडाम (वय ३२, रा. रासा घोंसा) याला अखेर भद्रावती पोलिसांनी अटक करून सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपी चोरीच्या उद्देशाने शहरात फिरत असताना ताब्यात घेण्यात आला. प्रारंभी टाळाटाळ केल्यानंतर पोलिसांनी घेतलेल्या कसोशीनंतर त्याने सुरक्षा नगरमधील घरफोडीची कबुली दिली. या घरफोडीत सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून २,५०,१०० चा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता. चौकशीत त्याने यापूर्वी आणखी तीन घरफोड्यांची कबुली दिली असून, त्या गुन्ह्यांतील मुद्देमालसुद्धा हस्तगत करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई ठाणेदार योगेश पारधी यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी विरेंद्र केदारे, गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, अनुप आष्टुनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, खुशाल कावळे, योगेश घाटोळे व भूषण चौधरी यांनी पार पाडली. भद्रावती शहरात घरफोडींच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणात या कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, पोलिसांच्या कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक होत आहे. आरोपीचा गुन्हेगारी इतिहास उघड करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.