राजूरात विविध ठिकाणी जागतिक योग दिन उत्साहात साजरा
आमचा विदर्भ -
राजूरा (दि. २१ जून २०२५) -
जागतिक योग दिनानिमित्त राजुरा शहरात विविध शैक्षणिक संस्था, स्थानिक प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 'सर्वांनी करा योग, रहा निरोग' या मुलमंत्राचा जागर करत हजारो नागरिकांनी योग साधनेत सहभाग घेतला.
नगरपरिषद तलावाजवळ पतंजली योग समितीचा योगाभ्यास
राजुरा शहरातील नगरपरिषद तलावासमोरील मोकळ्या जागेत पतंजली योग समिती राजुरा यांच्यावतीने भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. योग केवळ शारीरिक आरोग्यच नव्हे, तर मानसिक स्थैर्य, आत्मिक शांती व जीवनशैलीत शिस्त निर्माण करणारा मार्ग आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमात आमदार देवराव भोंगळे, उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, तहसीलदार तथा नगरपरिषद प्रशासक ओमप्रकाश गोंड, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. अशोक जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीकांत बोकडे, एपीआय पवार, पतंजली योग समितीचे पुंडलिक उराडे, योगप्रशिक्षक प्रा. हरिभाऊ डोर्लीकर, जेष्ठ पत्रकार मुखरू सेलोटे, सोनल चिडे, प्रभाकर चन्ने, बंडू मानुसमारे, ॲड. सदानंद लांडे, संदीप जैन, डॉ. नगराळे, प्रा.बी.यु. बोर्डेवार, श्रीकृष्ण गोरे, भाजप शहराध्यक्ष सुरेश रागीट व शेकडो मान्यवरांची उपस्थिती होती.
इन्फंट जीजस इंग्लिश स्कूल व कल्याण नर्सिंग कॉलेजचा संयुक्त उपक्रम
इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल, कल्याण नर्सिंग कॉलेज आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन माजी आमदार व संस्थापक अध्यक्ष सुभाष धोटे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थिनी कुमारी जीविका वैद्य आणि योग प्रशिक्षकांनी योगाचे जीवनातील महत्त्व विशद केले. यावेळी संस्थेचे सचिव व माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, अध्यक्ष अभिजीत धोटे, उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, तहसीलदार ओमप्रकाश गौंड, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. अशोक जाधव, पतंजली समिती अध्यक्ष प्रशिक्षक हरिभाऊ डोर्लीकर, मुख्याध्यापिका मंजुषा आलोने, सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, शिक्षकवृंद, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग झाले. कार्यक्रमाचे संचालन व आभार संतोष सागर यांनी मानले.
आदर्श शाळेत 'एक पृथ्वी, एक आरोग्य' या थीमवर 'हरीत योगा'
बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर व आदर्श हायस्कूल राजुरा येथे योग दिन "एक पृथ्वी, एक आरोग्य" या संकल्पनेवर आधारित होता. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था आणि राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब, स्काऊट-गाईड युनिट, कब-बुलबुल यांच्या सहभागातून ‘हरीत योगा’ प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी योग शिक्षिका सरला आंबटकर, सविता गिरडकर, सुवर्णा घटे, माधुरी भोयर, किरण चन्ने, भास्कर येसेकर, मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर, जेष्ठ शिक्षिका ज्योती कल्लुरवार, स्काऊट शिक्षक बादल बेले, शिक्षक रुपेश चिडे, रोशनी कांबळे, सुनीता कोरडे, वैशाली टिपले, अर्चना मारोटकर, रजनी पिदुरकर, प्राजक्ता साळवे, किसन वेडमे, वैशाली चीमुरकर, हायस्कूल शिक्षक नवनाथ बुटले, विकास बावणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ज्योती कल्लुरवार, तर प्रास्ताविक मुख्याध्यापिका नलिनी पिंगे यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.