राजुरातील खुनाचा थरारक उलगडा – अल्पवयीन आरोपी ताब्यात
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २२ जून २०२५) -
राजुरा शहरातील रमाबाई वॉर्ड येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेचा अखेर उलगडा झाला आहे. कविता लक्ष्मण रायपुरे (वय ५३) या महिलेचा तिच्या स्वतःच्या घरात निर्घृण खून करण्यात आला होता. घराच्या गेटला कुलूप लावलेले असतानाही अज्ञात इसमाने घरात घुसून धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर वार करून अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती.
या प्रकरणी राजुरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. 293/2025 कलम 103(1), 332(ब) भा.न्या.सं. 2023 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मा. पोलीस अधीक्षक सुरदर्शन मुम्मका यांनी घटनास्थळी भेट देत स्थानिक गुन्हे शाखा व गुन्हे प्रकटीकरण शाखा राजुरा यांना तपासाची जबाबदारी सोपवली. तपासदरम्यान परिसरातील १५ ते २० ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, ४० संशयितांची कसून चौकशी, तांत्रिक विश्लेषण, आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने सहा दिवस रात्रंदिवस अथक परिश्रम घेण्यात आले. शेवटी तपास अधिक खोलवर केल्यावर विधीसंघर्षग्रस्त एका अल्पवयीन मुलास विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त करण्यात आला असून पोलीसांनी गुन्हा उघडकीस आणला आहे.
संपूर्ण कारवाई राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमीत परतेकी यांच्या नेतृत्वात आणि मा. अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कामगिरीत सपोनि निशा भुते, हेमंत पवार, पोउपनि पांडुरंग हाके, भिष्मराज सोरते, चाटे, सफौ. किशोर तुमराम, पो.ह. विक्की निर्वाण, महेश बोलगोडवार, शफीक शेख, शरद राठोड, अविनाश बांबोळे, आनंद मोरे व इतर पोलीस कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.