Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चंद्रपूर क्रीडा संकुलातील जलतरण तलावात सुरक्षेचा अभाव
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूर क्रीडा संकुलातील जलतरण तलावात सुरक्षेचा अभाव हिमायू अली यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आमचा विदर्भ -  चंद्रपूर (दि. १९ जून २०२५) - ...
चंद्रपूर क्रीडा संकुलातील जलतरण तलावात सुरक्षेचा अभाव
हिमायू अली यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
आमचा विदर्भ - 
चंद्रपूर (दि. १९ जून २०२५) -
        शहरातील क्रीडा संकुलामधील जलतरण तलावात मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर तक्रारी समोर येत असून, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाध्यक्ष हिमायू अली यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून या त्रुटींविषयी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जलतरण तलावाभोवती बसवण्यात आलेल्या मार्बल टाईल्स सतत ओल्या राहत असल्याने त्यावरून फिसलण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे लहान मुले, युवक व वृद्ध यांना दररोज घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. अली यांनी असेही नमूद केले की, सद्यस्थितीत तीन वेगवेगळ्या संस्थांमार्फत जलतरण प्रशिक्षण दिले जात आहे, परंतु कोणताही अधिकृत व प्रशिक्षित प्रशिक्षक तैनात नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून मुलांच्या जीविताला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रमुख मागण्या:
  • फिसलणाऱ्या टाईल्स तात्काळ काढून योग्य पर्याय बसवावा.
  • फक्त अधिकृत प्रमाणित जलतरण प्रशिक्षकांमार्फतच प्रशिक्षण दिले जावे.
  • संपूर्ण क्रीडा संकुलाची सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करून सुधारणा कराव्यात.
  • अली यांनी यावर त्वरित जनहितार्थ व विशेषतः मुलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी केली.
        या निवेदनाची प्रत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा कांबळे, हाजी अली, आणि सिद्धार्थ शेवगावकर उपस्थित होते. आता पाहावे लागेल की जिल्हा प्रशासन या गंभीर सुरक्षाविषयक प्रश्नांकडे किती गांभीर्याने प्रतिसाद देते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top