Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: "मॉर्निंग वॉल्क ला गेलेल्या महिलेचा दुर्दैवी अंत''
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"मॉर्निंग वॉल्क ला गेलेल्या महिलेचा दुर्दैवी अंत'' "ट्रक-पिकअप अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू" गडचांदूर  (दि. ०७ जू...
"मॉर्निंग वॉल्क ला गेलेल्या महिलेचा दुर्दैवी अंत''
"ट्रक-पिकअप अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू"
गडचांदूर (दि. ०७ जून २०२५) -
        गडचांदूर शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक अराजकतेमुळे अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी पहाटे घडलेल्या एका भीषण अपघातात एका ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

        हा अपघात ६ जून रोजी सकाळी ५.३० वाजता थुट्रा रोडवरील माणिकगड गेटपासून काही अंतरावर रेल्वे क्रॉसिंगच्या आधी घडला. ए.पी. ०७ टी.ई ९१०९ क्रमांकाच्या ट्रकने एम.एच. ३४ जि.बी. २७४० क्रमांकाच्या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रकने पिकअपला बाजूला घासत नेले आणि शेवटी एक विद्युत खांब उडवला. धडक इतकी जोरदार होती की, इलेक्ट्रिक पोल जमिनीवर सपाट पडला. या अपघातात लता लक्ष्मण मुन (वय ५०) या फिरायला निघालेल्या महिलेला पिकअपमध्ये दबून मृत्यू आला. त्या जागीच प्राण सोडल्या. या दुर्घटनेमुळे सकाळी व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

        गडचांदूर शहरात फिरण्यासाठी सुरक्षित जागा नसल्यामुळे नागरिकांना रस्त्याच्या कडेला चालावे लागते. मात्र रस्त्याच्या कडेला माणिकगड सिमेंट कंपनीचे ट्रक जागोजागी उभे असल्यामुळे अपघाताचा धोका वाढतो आहे. नागरिकांनी याविरोधात वेळोवेळी निवेदने व मोर्चे काढले तरी प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना होताना दिसत नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. ट्रक जिवंत विद्युततारांशी संपर्कात असल्यामुळे तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला. पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिवाजी कदम यांनी स्वतः घटनास्थळी पाहणी केली आणि मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पुढील तपास ठाणेदार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top