दुचाकी अपघातात तरुण ठार, एक गंभीर जखमी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 05 जुन 2025) -
गडचांदूर–राजुरा महामार्गावर नाईकनगर गावाजवळ सायंकाळी साडेसातच्या सुमारास भीषण दुचाकी अपघात झाला. या अपघातात उमेश रामदास लेनगुरे वय ४२, रा. चिरोली, ता. मूल यांचा जागीच मृत्यू झाला, तर लंकेश कैलास मानकर वय ४७, रा. कढोली, ता. राजुरा हे गंभीर जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, समोरून येणाऱ्या एमए-२९ बीसी-०५६८ या कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांचेही पाय तुटले आणि प्रचंड रक्तस्त्राव झाला. नाईकनगरमधील स्थानिक नागरिक तत्काळ मदतीला धावले. त्यांनी १०८ क्रमांकावर कॉल केला. परंतु, ॲम्ब्युलन्स तब्बल एक तास उशिरा पोहचली, जोपर्यंत एकाची प्रकृती खालावून मृत्यू झाला. प्रथम दोघांनाही राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात, आणि तिथून नागपूरकडे हलवताना उमेश लेनगुरे यांचा वाटेतच मृत्यू झाला. अपघाताचे प्रमुख कारण म्हणजे महामार्गावरील अपूर्ण काम, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि वाहतूक नियमनाचा अभाव. नागरिकांच्या मते, महामार्गावर अपघात होणे नवीन नाही. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष जीवावर बेतत आहे. अपघातग्रस्तांसाठी तत्काळ व कार्यक्षम ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून द्यावी, महामार्गावर दिशादर्शक फलक लावावेत, जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.