आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ११ ऑक्टॉबर २०२३) -
रामपुर येथील संदीप देवराव निमकर यांची (दि. ९) ला दगडाने ठेऊन निर्घृण हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले होते. पण पोलिसांनी काही तासामध्ये सूत्र हलवीत तीन मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
राजुरा शहरालगत असलेल्या रामपुर गावातील वॉर्ड क्रमांक २ मध्ये साई मंदिर जवळ राहत असलेला संदीप देवराव निमकर (वय २८) हा युवक बेपत्ता झाला होता. त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेतला पण माहिती मिळू शकली नाही. काल मात्र गावलागतच्या मथरा जंगलात त्यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. या युवकाची रामपुर जंगलात अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तपास कार्य सुरू केले व काही तासात तिघांना ताब्यात घेतले. यात वीरेंद्र बोन्तला (२१), विष्णु बोन्थला व संकेत उपरे या २२-२५ वयोगटातील युवकांना ताब्यात घेतले. (The dead body was found in Mathara forest near Rajura-Rampur)
संदीप निमकर हा आपल्या आई वडिलाना एकुलता एक मुलगा होता. (दि. ९) रोज सोमवारला रात्री आठ वाजता घरून निघून गेला तेव्हापासून घरच्यांनी शोधाशोध सुरू केली असता रामपुर लगत जंगलात झुडपामध्ये संदीप यांचा मृतदेह दिसून आला. ही माहिती राजुरा पोलिसांना मिळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेसी यांच्या मार्गदर्शनात अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे व राजुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हत्याऱ्याचा तपास सुरू केला. (Police Station Rajura)
मंगळावरला रात्री संदीप निमकर यांचा मारेकरी वीरेंद्र बोंतला (वय २१) मू. रामपुर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांची कसून चौकशी केली असता संदीप आणि विरेंद्र एकाच वार्डमध्ये राहत असून घटनेच्या दिवशी तिघेही दारू पिण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेले त्याठिकाणी नशेत असताना संदीप व विरेंद्र यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली असता राग अनावर झाल्याने काठी व दगडाने संदीपची खून केल्याची कबुली दिली. यात त्यांच्या साथीला त्यांचे बंधू विष्णू बोंथला (वय २२) व संकेत उपरे (वय २५) राजुरा यांनी संदीपची हत्या करण्यासाठी मदत केल्याचे पोलिसांना सांगितले यांच्यावर भांडवी कलम ३०२, ४३, २०१ लावली असून समोरील तपास राजुराचे पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी करीत आहे. (rajura) (aamcha vidarbha)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.