Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शासकीय पदभरती कंत्राटी पद्धतीने भरण्याचा विरोध
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तहसील कार्यालयावर धडकला जनआक्रोश मोर्चा आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. १८ सप्टेंबर २०२३) -         अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती ...
तहसील कार्यालयावर धडकला जनआक्रोश मोर्चा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १८ सप्टेंबर २०२३) -
        अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती ही कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शासनाने घेतलेल्या या कंत्राटी भरती प्रक्रियेला विरोध करत पुरोगामी विचारमंचच्या वतीने (Purogami Vichar Manch) द्वारा सरकारच्या शिक्षणविरोधी धोरणाचा निषेध करत तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. 

        आज दि. 18 सप्टेंबर 2023 ला पुरोगामी विचारमंच राजुरा द्वारा भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यात जवळपास राजुरा शहरातील 25 सामाजिक संघटनांचा सक्रिय सहभाग नोंदविला. जनआक्रोश मोर्चा संविधान चौक, नाका नं ३, भारत चौक, गांधी चौक, नेहरू चौक, आंबेडकर चौक मार्गे तहसील कार्यालयात धडकला. मार्गात सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जनविरोधी जीआर गांधी चौक व तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जाळण्यात आला.

        महाराष्ट्र सरकारने नुकताच जीआर काढून शासकीय सेवेतील पदभरती कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुलांचे भविष्य दावणीला लागणार आहे. शासनाच्या या निर्णयाने शासकीय नोकरीला लागण्याचे तरुणांचे स्वप्न आता भंगणार आहे. या निर्णयामुळे आरक्षणा सारख्या संवैधानिक मुद्द्यालाही निकामी करत केवळ कागदावरच ठेवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आरक्षणाला महत्व उरणार नसून गरिबी व दरिद्रता राज्यातील जनतेच्या नशिबी मारण्याचा डाव राज्यकर्त्यांनी मांडला आहे. राज्यातील 62 हजार सरकारी शाळा 10 वर्षाकरिता भौतिक सुविधा उपलब्ध करुण देण्याच्या नावावर कॉर्पोरेट क्षेत्रातील खासगी कंपन्यांना दत्तक देऊन छुप्या पद्धतीने शाळांचे खासगिकरण करण्याचा डाव आखून राज्यातील तमाम बहुजन मुलांच्या शिक्षणाच्या घटनादत्त अधिकारावर घाला घालणार आहे. (A public outcry march hit the Tehsil office)

         हे जनविरोधी जीआर महाराष्ट्र शासनाने परत घेतले नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा निवेदना द्वारा देण्यात आला. मोर्च्यात धीरज मेश्राम, दिनेश पारखी, आनंदराव अंगलवार, ॲड.मारोती कुरवटकर, अमोल राऊत, संतोष कुळमेथे, रमेश आड़े, संभाजी साळवे, पुंडलिक वाढ़ई, ॲड. डॉ.सत्यपाल कातकर, बलवंत ठाकरे, डॉ.मधुकर कोटनाके, संदिप कोंडेकर, प्रदिप पायघन, फझल, श्रीकृष्ण वडस्कर, किसन बावणे, विजय मोरे, साईनाथ परसुटकर, किरण लांडे, धनंजय बोरडे, सुभाष पावड़े, विजय भोयर, दिलीप गिरसावळे, नंदू वाढ़ई, दिलीप निमकर, नीलेश पवार, मनोज सदाफळे, संजय बोबाटे, पी.एन. वाढ़ई, परिसरातील युवक-युवती, महिला, शिक्षक व नागरिकांची उपस्थिती दर्शिविली. (rajura) (aamcha vidarbha)


Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top