आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १८ सप्टेंबर २०२३) -
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मनोरंजनासाठी म्हणून करमणुकीच्या उदेशाने काही अटी व शर्ती सह फक्त करमणुकीसाठीच महाराष्ट्र शासनाद्वारे विविध प्रकारच्या संस्थांना परवाने दिले जातात परंतु त्या परवाना मध्ये दिलेल्या अटी व शर्तींचे सर्रास उल्लंघन करीत पोलीस प्रशासनाला हाताशी घेऊन अनेक परवानाधारक हे मोठ्या प्रमाणावर लाखो करोडो रुपयांचा आलिशान जुगार अड्डा चालवत असल्याचे अनेकदा समोर आले. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अशा परवानांना पुन्हा नूतनीकरण करण्यात येऊ नये याकरिता सामाजिक संघटना आक्षेप घेत असून राजुऱ्यामध्ये सुरू असलेल्या क्लब वर सुरज ठाकरे यांनी आक्षेप घेत सदर क्लब हा बंद पाडला होता परंतु जिल्ह्यात कुठल्याही क्लबचा परवाना नूतनीकरण न करता युथ सोशल क्लब चंद्रपूर यांचाच परवाना नूतनीकरण करून दिला. राजुरा तालुक्यातील आसिफाबाद रोडवर असलेल्या वरुड रोड या गावानजीक जुगार अड्डाच या क्लबच्या नावाखाली सुरू केला आहे. त्यामुळे या क्लबचा परवाना तात्काळ रद्द करावा अन्यथा येता दहा दिवसांमध्ये मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा सुरज ठाकरे (Suraj Thackeray) यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना दिलेल्या निवेदनामध्ये दिला आहे. (A luxurious gambling den is operating under license) (manoranjan club)
या क्लबला वरून रोड येथील रोडवरच असलेल्या चर्च, शाळा, तसेच ग्रामस्थांचा विरोध आहे या याबाबत चर्च शाळा तसेच ग्रामस्थांचे लेखी आक्षेप देखील सुरज ठाकरे यांनी निवेदनासोबत दिला आहे. या क्लब मध्ये मोठे गुन्हेगार व मोठे जुगार खेळणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येत आहेत. असा आरोप सुरज ठाकरे यांनी आपल्या निवेदनात केला आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये शांतताप्रिय व कायद्याचे राज्य असणाऱ्या राजुरा तालुक्यामध्ये दोनदा गोळीबारी होऊन खून झाले आहेत तसेच अशा प्रकारच्या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे. या क्लब मुळे देखील भविष्यामध्ये आर्थिक देवाण-घेवाण अथवा वैमनस्त्यामुळे मोठा घातपात होण्याची दाट शक्यता असल्याचे सूरज ठाकरे यांनी आपल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. येत्या दहा दिवसांमध्ये सदर क्लब वर कारवाई करून सदर क्लब बंधन केल्यास क्लब विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा सुरज ठाकरे यांनी दिला आहे.
प्रशासन आता या सुरज ठाकरे व ग्रामस्थ तसेच चर्च व शाळा यांच्या संयुक्त मागणीवर क्लब विरोधात काय कारवाई करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (rajura) (aamcha vidarbha)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.