आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ११ नोव्हेंबर २०२५) -
राजुरा नगरपरिषदेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपला धक्का देण्याच्या तयारीत काँग्रेस आणि शेतकरी संघटना एकत्र आली आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली ही युती अखेर प्रत्यक्षात उतरली असून आज दिनांक ११ नोव्हेंबर रोजी राजुरा येथील छत्रपती शिवाजी संकुलात झालेल्या भरगच्च गर्दीच्या सभेत दोन्ही पक्षांनी अधिकृत घोषणा करत सत्तेची वज्रमूठ घट्ट केल्याचा दावा केला. सभागृहात झालेल्या टाळ्यांच्या गडगडाटातून कार्यकर्त्यांनी या निर्णयाचा उत्साहात स्वीकार केला.
या युतीनुसार काँग्रेस १२ जागांवर, तर शेतकरी संघटना ९ जागांवर लढणार असून नगराध्यक्ष पदासाठी विकासपुरुष अरुण धोटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. घोषणा होताच मंचासमोर घोषणाबाजी, टाळ्या आणि आनंदाचा माहोल निर्माण झाला. शहरातील राजकीय समीकरणे बदलणारा हा निर्णय मानला जात आहे.
या सभेच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते, माजी आमदार ॲड. वामनराव चटप होते. प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार सुभाष धोटे, निळकंठराव कोरांगे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, स्वामी येरोलवार, सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष दिनकर कर्नेवार, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. कुंदा जेनेकर, ॲड. दिपक चटप, माजी उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे, सभापती विकास देवाळकर, रंजन लांडे, कामगार नेते सुरज ठाकरे, सिध्दार्थ पथाडे, रमेश नळे, दिलीप देठे, हरजितसिंग संधू, निर्मला कुडमेथे, संध्या चांदेकर, नरेंद्र काकडे, दिलीप देरकर, सय्यद सकावत अली, संतोष इंदूरवार, घनश्याम हिंगणे, कोमल फुसाटे आदी पदाधिकारी प्रकर्षाने उपस्थित होते.
सभेत भाषण करताना माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी भाजपवर थेट हल्ला चढवत म्हटले की, २००१ पासून नगर विकास आघाडीने राजुरामध्ये सत्ता टिकवली आणि विरोधकांना विजयाचा मार्गच बंद केला. आज शहरात सामान्य नागरिकांना न्याय नाही, शेतकऱ्यांना दिलासा नाही आणि भाजपचा कारभार म्हणजे अन्यायाचे साम्राज्य. युतीचा निर्णय हा राजुरातील जनतेला न्याय मिळवून देण्याचा मार्ग आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष, माजी आमदार सुभाष धोटे यांनी वोटचोरी, अव्यवस्था, अराजकता आणि शेतकरी – कामगारांवरील अन्याय यावर जोरदार टीका केली. भाजपची सत्ता ही जुलमी आहे, आणि नगरपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून भाजपला धडा शिकवण्याची हीच वेळ आहे, असे आवाहन त्यांनी केले. यानंतर निळकंठराव कोरांगे, ॲड. दिपक चटप, सिध्दार्थ पथाडे आणि अरुण धोटे यांनीही भाषणे करून युती मजबूत ठेवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन काँग्रेस जिल्हा महासचिव एजाज अहमद यांनी केले. सभेत सर्व उमेदवारांची ओळख करून देण्यात आली. काही इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याचे सांगत सर्वांनी एकदिलाने निवडणूक लढवून भाजपचा पराभव करण्याचे आवाहन करण्यात आले. सभेला काँग्रेस आणि शेतकरी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
#RajuraPolitics #CongressFarmersAlliance #ArunDhoteyForMayor #DefeatBJP #MunicipalElection #PoliticalStorm #TeamCongress #RajuraVotes #AlliancePower #VoteForChange #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.