आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. १ एप्रिल २०२३) -
(Nagar Parishad Gadchandur) नगर परिषद गडचांदुर येथे जेष्ठ नागरिक सेवा संस्था, गडचांदूर यांच्या मागणी नुसार आमदार सुभाष धोटे यांच्या स्थानिक निधी अंतर्गत जेष्ठ नागरिकांसाठी २० लक्ष रुपयाच्या सभागृहाचे बांधकाम पूर्ण होऊन या सभागृहाचे लोकार्पण आमदार सुभाष धोटे आणि शिक्षक आमदार सुधाकराव अडबाले यांचा हस्ते पार पडले.
या प्रसंगी नगराध्यक्षा सविता टेकाम, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक विलास धांडे, माजी जि. प. सदस्य तथा जेष्ठ नेते अरुण निमजे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव थिपे, नामदेवराव येरणे, सचिव बाळासाहेब मोहितकर, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र अरोरा, नगरसेवक पापय्या पोनमवार, माजी सभापती रऊफ खान वजीर खान, नगरसेवक विक्रम येरणे, अर्चना वांढरे, अरविंद मेश्राम, शहराध्यक्ष संतोष महाडोळे, रुपेश चुदरी, शिवकुमार राठी, एल डी मोहितकर, लक्ष्मण दरेकर, बाबुराव शेरकी, शिवजी शेलोरकर, देविदास मुन यासह जेष्ठ नागरिक, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (Mayor Savita Tekam) (Gadchandur)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.