Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जनतेने दिलेले प्रेम न विसरता येणारे : राजेंद्र पचारे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपना येथे सेवानिवृत्तीपर सत्कार आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. १ एप्रिल २०२३) -         कोरपनाचे मंडळ अधिकारी...
कोरपना येथे सेवानिवृत्तीपर सत्कार
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. १ एप्रिल २०२३) -
        कोरपनाचे मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे हे नियत वयोमानाप्रमाणे ३१ मार्चला (Retired from Government Service) शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्या निमित्त त्याच्या सेवा कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. (Korpana Circle Officer Rajendra Pachare)

        याप्रसंगी कोरपना चे तहसीलदार महेंद्र वाकलेकर, नायब तहसिलदार संजय भगत, मंडळ अधिकारी चव्हाण, तलाठी सोहेल अन्सारी, अमोल गोसाई, प्रकाश कमलवार सह सर्व महसूल विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. (korpana)

        राजेंद्र पचारे यांनी २४ एप्रिल १९८६ ला तलाठी पदाचा सर्व प्रथम कार्यभार सांभाळला. पुढे पदोन्नती मंडळ अधिकारी चा प्रभार त्यांनी स्वीकारला. शासकीय सेवेत त्यांनी ३६ वर्ष १२ महिने ३ दिवस त्यांनी जनतेची सेवा केली. पचारे यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असल्याने त्यांनी लोकं उपयोगी उपक्रम राबवत अनेक जटील प्रश्न कौशल्यपूर्णक सोडवले. पटवारी संघटनेत ही त्यांनी विविध पदे भूषविली. कला क्षेत्रात विशेष रुची असल्याने त्यांनी अनेक लघु नाटिका शब्दांकित केल्या. कोल्हापूर येथील  अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे ते सभासद आहे. सत्कार समारंभ प्रसंगी शासकीय सेवेत असताना जनतेने व कर्मचाऱ्यांनी दिलेले प्रेम न विसरता येणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरेंद्र मडावी संचालन अमोल गोसाई यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी संजय कुडमेथे, विशाल कोसनकर, राजेश माकोडे, निलेश बोधे, नदू, बंडू, अरुण विधाते, चंदू अहिरकर धीरज फुटाणे, रुपेश पानघाटे, लांबट, मनीषा शिखरे, मनीषा मालेकर, प्रणिता मालेकर, निशा सोयाम आदी उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top