Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: 11 एप्रिल शासकीय सुट्टी जाहीर करा - मराठा सेवा संघाची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - विरेंद्र पुणेकर तालुका प्रतिनिधी राजुरा (दि. ७ एप्रिल २०२३) -         Maratha Seva Sangh Branch Rajura मराठा सेवा संघ शाखा राज...
आमचा विदर्भ - विरेंद्र पुणेकर तालुका प्रतिनिधी
राजुरा (दि. ७ एप्रिल २०२३) -
        Maratha Seva Sangh Branch Rajura मराठा सेवा संघ शाखा राजुरा तर्फे 11 एप्रिल महात्मा फुले जन्मदिवसाची शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्याला उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले. (Declare a government holiday on Mahatma Phule's birthday) (rajura)

        आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांना मानण्यात येते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वातंत्र्य, समता व न्यायमूल्य भारतातच नाही तर विश्वात रुजविण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. महात्मा फुले यांनी सत्य प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. 

        मराठी भाषेत पोवाड्यारूपी शिवचरित्र लिहिण्याचा, कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची लपवलेली समाधी शोधण्याचा व शिवजयंती सुरू करण्याचा तात्यासाहेब महात्मा फुले याना जातो. महात्मा फुलेंचे गुरू शिवाजी महाराज व महात्मा फुले यांना गुरू मानणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शासकीय सुट्टी म्हणून मंजूर आहे परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीस शासकीय सुट्टी नाही. त्याकरिता शासनाने महात्मा फुले जन्मदिवस शासकीय सुट्टी जाहीर करावी. अश्या आशयाचे निवेदन दिनेश पारखी, लक्ष्मण तुराणकर, गौतम चौरे आणि दिलीप गिरसावळे यांनी दिले. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top