चंद्रपूर (दि. ७ एप्रिल २०२३) -
राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संघटना म्हणून (Voice of Media) व्हाईस ऑफ मीडियाची ओळख आहे. या संघटनेच्या साप्ताहिक विभागाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी जितेंद्र जोगड यांची नियुक्ती करण्यात आली. व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि साप्ताहिक विभाग प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांनी या नियुक्तीचे पत्र पाठविले. (Weekly Division) (District President)
जितेंद्र जोगड (Jitendra Jogad) हे चंद्रपुर जिल्ह्यातील ज्येष्ठ संपादक असून मागील 23 वर्षापासून पत्रकारीतेत व 14 वर्षापासून वृतपत्रचे संपादक आहेत. विदर्भ की बात या वर्तमानपत्रात जिल्हा प्रतिनिधि म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. रजिस्ट्रेशन ऑफ न्यूज़पेपर (RNI) या विषयावर त्यांचा चांगला अभ्यास असल्याने राज्यातील व इतर राज्यातील साप्ताहिक वर्तमानपत्र मालक व संपादक, जितेंद्र जोगड यांच्या मार्गदर्शना करिता वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन घेत असतात. (Registration of Newspapers)
जितेंद्र जोगड हे साप्ताहिक लोक तंत्र की आवाज़ आणि लोकतंत्र की आवाज़ या डिजिटल मीडिया पोर्टलचे संपादक आहेत. या क्षेत्रातील विविध पुरस्काराचे ते मानकरी ठरले आहेत. विविध सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक, व्यापारी संघटनांशी ते जुडले असून, व्हाईस ऑफ मीडियाच्या या माध्यमातून वृतपत्रा चे RNI एनुअल रिपोर्ट सबमिट शिबिर आणि RNI चे नवीन नियम यावर प्रशिक्षण मेळावे आयोजित करून चंद्रपुर जिल्ह्यातील साप्ताहिक संपादकांना पत्रकारांना प्रशिक्षित करू, असा विश्वास त्यांनी नियुक्तीप्रसंगी व्यक्त केला आहे. (chandrapur)
जितेंद्र जोगड यांची निवड झाल्याबद्दल, व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, साप्ताहिक विभाग प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, जिल्हा अध्यक्ष संजय पडोळे, चंद्रपुर महानगर अध्यक्ष सारंग पांडे, चंद्रपुर महानगर कार्याध्यक्ष जितेंद्र चोरडिया यांचे त्यांनी आभार मानले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील साप्ताहिक विभागची कार्यकारणी लवकरच घोषित करण्यात येणार असून या संघटनेची जुळून कार्य करण्याकरिता 9822220273 वर संपर्क साधण्याचे आवाहन जितेंद्र जोगड यांच्या कडून करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.