कोरपना (दि. १५ एप्रिल २०२३) -
तालुक्यातील कन्हाळगाव येथील एका घरात साठवलेल्या कापसाला विद्युत शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही घटना शनिवार दि. १५ ला सकाळी दहा वाजता घडली. (The cotton caught fire due to an electrical short circuit) (korpana)
प्राप्त माहितीनुसार, कन्हाळगाव येथील रामचंद्र झोलबाजी वासेकार यांचा कापूस वेचणी झाल्यानंतरचा कापूस जुन्या घरात साठवून होता. आज दहा वाजता दरम्यान अचानक विद्युत शॉर्ट सर्किट झाल्याने लागलेल्या आगीत तेथील ५ क्विंटल कापूस, दरवाजा, कवेलुचे तीन पत्राचे नुकसान झाले. त्याची अंदाजे किंमत ५८ हजार रुपये वर्तविण्यात येत आहे. या घटनेचा महसूल व पोलिसांनी पंचनामा केला. यावेळी तलाठी कमलवार, पोलीस उपनिरीक्षक खेकाडे, पोलीस पाटील आदी उपस्थित होते. घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.