आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधि
कोरपना (दि. १५ एप्रिल २०२३) -
शेतकऱ्याची अडचण लक्षात घेता आगामी हंगामसाठी राष्ट्रीयकृत्व व सहकारी बँकानी पीक कर्ज वाटप कार्यक्रम त्वरित घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आबिद अली यांनी केली आहे. (korpana) (aamcha vidarbha)
(Farmers are in trouble due to low price of agricultural products) शेतकऱ्यांचा यंदाचा हंगाम मार्च एप्रिल पासून संपला आहे. पुढील हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी लागलेला आहे. नांगरणी, वखरणी, बियाणे घेणे, शेत मजुरांना मजुरी देण्या आदींसाठी शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज येऊन ठेपली आहे. यंदाच्या हंगामात कापसाला अत्यलप भाव मिळाल्याने शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात अडकला आहे. कसे बसे जुडवा जुडव करून त्यांनी मार्च महिन्यात आपले मागील वर्षीचे पीक कर्ज भरले. त्यामुळे त्याच्या कडे आता दमडी सुद्धा उरली नाही. सोयाबीन, तूर, हरभरा या शेतमालाला विक्रीत ही शेतकऱ्याची बऱ्याच ठिकाणी आर्थिक पिळवणूक झाली. तसेच अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी वर्गान पुढे आर्थिक चंचन जाणवत आहे. तसेच लग्न, बोरवण, कौटुंबिक प्रसंगाचे कार्यक्रम आगामी काळात येऊन ठाकले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे असे स्थिती आहे. बरेच शेतकरी यामुळे चिंता क्रांत झाले आहे. त्यामुळे शासनाने हस्तक्षेप करून बँकांना पीक कर्ज त्वरित देण्यासाठी निर्देश द्यावे व शेतकऱ्याची अडचण दूर सारावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.