Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कोरपना तालुक्यात "वाळू तस्करी जोमात, तर महसुल प्रशासन कोमात"
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपना तालुक्यात "वाळू तस्करी जोमात, तर महसुल प्रशासन कोमात" तहसिलदारा विरोधात अनेक तक्रारी असतांनाही त्यांच्यावर कोणतीच कारवाई का...

  • कोरपना तालुक्यात "वाळू तस्करी जोमात, तर महसुल प्रशासन कोमात"
  • तहसिलदारा विरोधात अनेक तक्रारी असतांनाही त्यांच्यावर कोणतीच कारवाई का होत नाही हे नवलच
  • तामसी, कोळसी घाटधारकांची पाठराखण 
  • राजकीय नेत्यांचे व प्रशासकीय अधिकार्‍यांचे पाठबळ असल्याची चर्चा
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी 
कोरपना -
मागील काही वर्षापासून कोरपना तालुक्यात अवैध गौण खनिज वाळू तस्करी जोरात सुरु आहे. येथील घाटधारक न्यायालयाच्या दिशा निर्देशांचे पालन न करता नदीमध्ये कच्चा रस्ता तयार करून पोकलेन, जेसीबी, हायवाच्या माध्यमातुन लाखो ब्रास अवैध रेती उत्खनन करीत असतांना कोरपनाच्या महसुल विभाग हात बांधून बसला होता. कोळशी, तामसी, सांगोडा, अंतरगाव या ठिकाणावरुन आजही राजरोसपणे नदी घाटात अवैध उत्खनन करून रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तालुक्यात पुरेशी प्रशासकीय यंत्रणा असतांनाही अर्थ कारणामुळे रेती तस्करांना आळा घालण्यात अपयशी ठरले आहे. आता रेती तस्करांची हिम्मत वाढल्याने ते मंडळ अधिकार्‍यांचे हातपाय तोडण्याची आणि जिवेस मारण्याच्या धमक्या देत आहे. तहसिलदारांनी अवैध रेती तस्करी कायम स्वरुपी थांबविण्याकरीता कुठल्याच उपाययोजना केल्या नसल्याने मागील ३ वर्षात शासनाचा तिजोरीला करोडोचा चुना लागला असुन पर्यावरणाची पुरतीवाट लागली आहे. तहसिलदारा विरोधात अनेक तक्रारी असतांनाही त्यांच्यावर कोणतीच कारवाई का होत नाही हे नवलच. मोठ्या राजकीय नेत्यांचे व प्रशासकीय अधिकार्‍यांचे पाठबळ असल्याने तहसिलदार महोदयांचा मनमानी कारभार सुरु आहे.

तामसी, कोळसी घाटधारकांची पाठराखण 
तामसी येथील घाटधारकांना तहसिलदार यांचेसह खनिकर्म विभागाची साथ असल्याने नदीपात्रात जेसीपीने अवैध उत्खनन करुन हायवाने लाखो ब्रास वाळू काढली घाटावर सीसीटीव्ही लावलेच नव्हते आणि आवशक असलेली आनलाईन इन्वाईस व जीपीएस प्रणाली कार्यान्वित नव्हती. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन करण्यात आले दिलेल्या लेआऊटच्या बाहेर उत्खनन केले. याउपरांत अवैधपणे रेती साठा प्रकरणी तलाठी यांचा अहवाल असतांनाही तहसिलदारांनी लपवाछपवी करत कारवाई केली नाही. यासर्व प्रकरणाची तक्रार झाल्यावरही खनिकर्म विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भ्रष्ट अधिकार्‍यांना वाचविण्यासाठी कारवाई करण्यात आली नाही. कोळशी घाटधारकाकडूनही नियमांचे सर्रास उल्लंघन करुन अवैधपणे उत्खनन केले गेले.तक्रारीला तहसिलदाराकडून केराची टोपली दाखविण्यात आली अवैध गौण खनिज तस्करीत करोडोचा मलिंदा मिळत असल्याने रक्षणदारच तस्करांचे संरक्षक बनले असल्याने रेती तस्करी नित्याची बाब बनली आहे.
कोरपना तालुका हा गौण खनिज तस्करांचे आश्रयस्थान बनला आहे. कोरपना तहसिल विभागात आतापर्यंत अवैध गौण खनिज चोरीचे अनेक कारनामे उघडकीस आले आहे. सोशल अक्टिविस्ट आणि कामगार नेते विजय ठाकरे यांनी त्याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी चंद्रपूर ते महसूल आयुक्त, नागपूर पर्यंत तक्रार केली आहे. कोरपना तहसीलदार यांची इरई तामसी घाटातील अवैध वाळूचोरी प्रकरण आणि वनविभागाने जप्त केलेले ट्रॅक्टर दंड न घेता सोडून दिल्या प्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. आता बदनामी टाळण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून येथील काही अधिकारी अवैध गौण खनिजाची चोरी करणाऱ्या छोट्या ट्रॅक्टरचालकांवरच कारवाई करत आहेत. 

रेती तस्करी जोमात
कोरपना तालुक्यात यावर्षी घाट लिलाव झाला नसल्याने स्थानिक रेती तस्करांकडून कोळशी, वनोजा, अंतरगाव, सांगोडा, तामसी, भोयगाव या नदीघाटातून दररोज राजरोसपणे रेती तस्करी सुरु आहे रेती चोरी रोखण्याकरीता कोतवाल, पोलीस पाटील, तलाठी व मंडळ अधिकारी अशी महसुली यंत्रणा आहे तर दुसरीकडे रेती तस्करांनी एकत्रित महसुली यंत्रणे सोबत सेटींग लावली तहसीलदार अथवा उच्च अधिकारी रेती तस्करी पकडण्यासाठी फिरत असल्याने रस्त्यावरील टप्याटप्यावर स्वत:चे हस्तकाकडून पाळत ठेवली जाते कोरपना तालुक्यात रेती तस्करी जोमात सुरु असल्याने महसुल प्रशासन कोमात असल्याचे दिसते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top