महाराष्ट्राची हास्यजत्रा कलाकारांची धमाल उपस्थिती
यहोवा यिरे फाऊंडेशनचे डॉ. रमेशकुमार बोरकुटे उपस्थित
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
नागपूर (दि. २१ ऑगस्ट २०२५) -
नागपूर पोलिस विभागाच्या सेवेप्रती कृतज्ञतेचा आणि सन्मानाचा उत्सव ठरलेला “नमन पुरस्कार सोहळा” सेन्टर पाईन्ट हॉटेल, नागपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. देशोन्नती संस्था आणि नागपूर लेडीज क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या सोहळ्यात नागपूर विभागातील विविध सर्कलमधून जबाबदारीने व प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या तब्बल २५ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये उप पोलीस आयुक्त नागपूर शहर राजेन्द्र दाभाडे, माजी पोलीस आयुक्त नागपूर भुषणकुमार उपाध्याय, तसेच सीईओ यहोवा यिरे फाऊंडेशन चंद्रपूर व आयएचआरसीसीसी महाराष्ट्र राज्य आयुक्त डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.
मुंबई पोलिसांच्या ‘उमंग’ कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन नमन पुरस्काराची संकल्पना राबविण्यात आली. देशोन्नती संस्था, संस्थापक नागपूर लेडीज क्लब सौ. सोनिया परमार आणि सौ. संगीता नायर यांच्या प्रयत्नातून या उपक्रमाला आकार मिळाला. पोलिस अधिकारी व कर्मचारी जे केवळ कर्तव्यापुरते मर्यादित न राहता समाजसेवा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेतात, त्यांचा गौरव करणे हे या पुरस्काराचे मुख्य उद्दिष्ट आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
पुरस्कार सोहळ्याला सांस्कृतिक रंग चढवण्यासाठी मराठमोळ्या हास्यकलेचा समावेश करण्यात आला. सोनी मराठीवरील लोकप्रिय “महाराष्ट्राची हास्यजत्रा” कार्यक्रमातील कलाकारांनी आपल्या उपस्थितीने हास्याचा पाऊस पाडला. अभिनेत्री चेतना भट्ट, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनेते समीर चौघुले यांनी सादर केलेल्या कलात्मक कार्यक्रमांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
समाजाप्रती कृतज्ञता
गौरवले गेलेले २५ पोलिस अधिकारी व कर्मचारी हे समाजातील खरे कर्तव्यनिष्ठ योद्धे असल्याचे यावेळी मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. नागपूर पोलिस विभागाच्या अनुकरणीय सेवेला “नमन पुरस्कार” हा योग्य तो सन्मान असल्याचे सर्वांनी स्पष्ट केले.
#NagpurPolice #NamanAwards #DutyAndHonor #PoliceHeroes #ServiceBeyondDuty #NagpurEvents #SaluteToPolice #JehovahYirehFoundation #drrameshkumarborkute #maharashtrachihasyajatra #Actress #ChetnaBhatt #PriyadarshiniIndalkar #SameerChoughule #namanpuraskar
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.