Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वाघमारे गुरुजींनी संजीवनीचे पालकत्व स्वीकारले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वाघमारे गुरुजींनी संजीवनीचे पालकत्व स्वीकारले आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनी सावित्रीबाई फ...

  • वाघमारे गुरुजींनी संजीवनीचे पालकत्व स्वीकारले
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करुन सावित्री - जिजाऊ जन्मोत्सवाला कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरापुर येथे सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी आपल्या  दातृत्वाचा परिचय देत निवृत्त मुख्याध्यापक माधव वाघमारे गुरुजी यांनी गरीब होतकरु व अभ्यासू विदयार्थीनी संजीवनी खाडे हिचे पालकत्व स्वीकारून तिला शिक्षणासाठी आर्थिक मदत केली . मागील पाच वर्षापासून वाघमारे गुरुजी दरवर्षी न चुकता तिला नियमित मदत करतात. तिला पदवीपर्यतचे शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. 
सावित्रीबाईच्या कार्याची महती मुख्याध्यापक धवणे यांनी सांगितले शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शारदा मडावी यानीही मार्गदर्शन केले सहायक शिक्षक गोखरे यांनी स्वरचित कविता सादर केले याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण बोढे, सदस्य रविताताई  कामतकर, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक विद्यार्थी उपस्थीत होते. सहायक शिक्षक अलोने यांनी संचालन केले. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top