- सावित्रीच्या लेकींची किती दिवस उपेक्षा?
- ३० वर्षांनंतरही १ रुपयाच उपस्थिती भत्ता
- शिक्षणातील मुलींचा टक्का वाढणार कसा?
- प्राथमिक शाळेतील मुलींचा उपस्थिती भत्ता वाढविण्यासाठी कोणीही आवाज उठविला नाही
- सावित्रीबाई फुले जयंती विशेष...
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंतच्या अनेक सुधारकांनी शिक्षणाची गंगा घरोघरी नेण्यासाठी अपार कष्ट घेतले. शाळेतील मुलींची उपस्थिती वाढावी, यासाठी शिक्षण विभागाने त्यांना शाळेतील उपस्थिती भत्ता देण्याचा निर्णय घेतला. मात्र, ३० वर्षांनंतरही तो दररोज एक रुपयावर कायम आहे. ही सावित्रीच्या लेकींची उपेक्षाच असून, शिक्षणातील मुलींचा टक्का वाढणार कसा? हा प्रश्न आहे.
ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलींचे उपस्थितीचे प्रमाण वाढावे, यासाठी शासनाने ३ जानेवारी १९९२ रोजी इयत्ता पहिली ते चौथी मध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद शाळांत शिकणाऱ्या अनुसूचित जातीजमाती, भटक्या व विमुक्त जमातींमधील दारिद्र्यरेषेखालील मुलींसाठी उपस्थिती भत्ता योजना सुरू केली. यामध्ये ७५ टक्के उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थिनींना दररोज १ रुपया याप्रमाणे दरवर्षी २२० रुपये उपस्थिती भत्ता दिला जातो. गेल्या ३० वर्षांत यामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही.
कोरोना काळात शिक्षण महागले आहे. खर्च परवडत नसल्याने मुलींवर शाळा सोडण्याची वेळ आली आहे. मात्र, एक रुपया उपस्थिती भत्ता देऊन शासनाने मुलींची थट्टा चालविली आहे, अशी भावना पालक व्यक्त करीत आहेत. प्राथमिक शाळेतील मुलींचा उपस्थिती भत्ता वाढविण्यासाठी कोणीही आवाज उठविलेला नाही.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.