वीज पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू, बैलही ठार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०७ ऑगस्ट २०२५) -
राजुरा तालुक्यात आज दुपारी विजेच्या गडगडाटासह झालेल्या जोरदार पावसाने दोन दुर्दैवी घटना घडल्या. मौजा देवाडा येथील विजय जंगू मंडळी (वय २१ वर्षे) या युवकाचा वीज पडून मृत्यू झाला. दुसरीकडे पाचगाव येथील शेतात कामावर असलेल्या बैलावर वीज पडून एक बैल ठार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचगाव येथील विजय मंडळी हा युवक मौजा खिर्डी येथे दुपारी सुमारे ३ वाजता शेतात काम करत असताना अंगावर वीज पडली. या आघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. विजय मंडळी यांच्या कुटुंबात केवळ आई आणि तो असा दोघांचाच आधार होता. त्यामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
तसेच, दुसरी घटना राजुरा तालुक्यातील मौजा अहेरी येथे साधारण १.३० वाजताच्या घडली. मधुकर तुकाराम सोयाम (वय ५२ वर्षे) हे चंद्रभान पांडुरंग चौधरी यांच्या शेतात कापूस ढवळणीच्या कामासाठी गेले होते. तेव्हा अचानक वादळी वाऱ्यासह वीज कोसळून शेतातील एक बैल जागीच ठार झाला. मात्र, सुदैवाने मधुकर सोयाम यांना केवळ किरकोळ दुखापत झाली असून त्यांना अहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार देण्यात आले. या दोन्ही घटनांचे पंचनामे करण्याचे निर्देश तहसीलदार ओमप्रकाश गोंड यांनी दिले आहेत.
दरम्यान, आज दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे राजुरा शहरातील काही सखल भाग जलमय झाले. विशेषतः बामणवाडा येथील स्नेहदीप कॉलनीमध्ये जोरदार पावसामुळे रस्ते जलमय झाले रस्त्यावर आणि घरात पाणी शिरल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. मात्र आज अचानक दुपारच्या सुमारास वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला.
विजय मंडळी यांच्या दुर्दैवी निधनाबद्दल आमदार देवराव भोंगळे यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, "विजय मंडळी यांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या कठीण प्रसंगी त्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे."
#ChandrapurRain #LightningStrike #RajuraNews #FarmerDeath #WeatherAlert #FloodInChandrapur #Monsoon2025 #LightningCasualty #HeavyRainAlert #ChandrapurUpdate #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.