Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: डाक विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडणार - आ. किशोर जोरगेवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
डाक विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडणार - आ. किशोर जोरगेवार भारतीय डाक कर्मचारी असोशिएशन चांदा विभागाच्या वतीन चौथ्या द्विवार्ष...


  • डाक विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडणार - आ. किशोर जोरगेवार
  • भारतीय डाक कर्मचारी असोशिएशन चांदा विभागाच्या वतीन चौथ्या द्विवार्षिक  संयुक्त अधिवेशनाचे आयोजन
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
भारत जगातील सर्वात मोठे टपाल नेटवर्क आहे. पोस्टमन हा त्यातील महत्वाचा लोकसेवक आहे. काळ बदलत असला तरी आजही पोस्टाने आलेल्या पत्राचे महत्व आणि त्याबाबतची आपूलकी अधिक असते. खर तर हे सेवाकरी कर्मचा-र्यांचे खाते आहे. या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे ही आपली भुमिका असून डाग विभागातील कर्मचा-र्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आज रविवारी भारतीय डाक कर्मचारी असोशिएशन चांदा विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात चौथ्या द्विवार्षिक संयुक्त अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बी.पी.ई.ए दिल्लीचे माजी राष्ट्रीय सेक्रेटरी एम.एस. चंदेल, बी.पी.ई.ए. मुंबई साउथ विभागाचे माजी सेक्रेटरी राजु खेबडे यांची मार्गदर्शक म्हणून, बी.पी.ई.ए मुबंई - चंद्रपूर चे माजी उपाध्यक्ष विजय खापणे यांची स्वागताध्यक्ष म्हणून तर रमेश अंजारीया, राम जमनू, रमेश टंेभरे, वसंत हरमाले, बी.डी देशमूख, प्रशांत तोरस्कर, मिलिंद कांबळे आदि मान्यवरांची प्रमूख पाहूणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, डाक विभाग हे अतिशय महत्वाचे विभाग आहे. बदलत्या काळात जीवनमान गतिमान झाले आहे. देवाणघेवाणीची संसाधने वाढली आहेत. अशातही डाग विभागाने आपली ओळख कायम ठेवली आहे. कोरोनाच्या लॉकडाउन काळातही  या विभागाने आपली उत्तम सेवा दिली. हा सेवा देणारा विभाग असून त्यांच्या प्रश्नांची आणि सुचनांची दखल घेतल्या गेली पाहिजे, देशात जवळपास 15 लाख 500 डाकघर आहेत. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top