धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या व तालुक्यातील सर्वात मोठी बाजार पेठ असणाऱ्या गड़चांदुर शहरात सोमवारी (3 जानेवारी) महात्मा गांधी विद्यालय येथे तहसील कार्यालय कोरपना तर्फे एक दिवसीय महाराजस्व अभियान सन 2021 -22 चे आयोजन करण्यात आले. या अभियानान्तर्गत, शैक्षणिक दाखले, जाती प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, शेती सातबारा तसेच इतर प्रमाणपत्र ची माहिती देण्यात आली व संपूर्ण योजना चा लाभ मिळवून देण्यात आला. शालेय विद्यार्थी व गावातील अनेक नागरिकांनी याचा लाभ घेतला. या वेळी नायब तहसीलदार श्री प्रवीण चिड़े, मंडळ अधिकारी एन. चव्हाण, पटवारी एम.एस. अंसारी, गावंडे, प्रणीता मालेकर, मनीषा मलेकर, विनोद खंडाले, उद्धव पूरी व इतर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.