- अभ्यास करून देशसेवा करण्यासाठी तत्पर रहा - डॉ.मंगेश गुलवाडे
- भाजपा महानगर शिक्षक आघाडी तर्फे 'बेटी बचाओ - बेटी पढाओ' कार्यक्रम संपन्न
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
क्रांतीज्योती व पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फूले यांच्या जयंती निमित्य 'बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ चा कार्यक्रम लोकमान्य टिळक (स्टेडियम) विद्यालय येथे साजरा करण्यात आला. महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या अध्यक्षतेखाली 'बेटी बचाओ-बेटी पढ़ाओं 'कार्यक्रमाचे आयोजन, भाजपा महानगर शिक्षक आघाडी तर्फे संयोजक अरुण रहांगडाले, अध्यक्ष मोहम्मद जिलानी, महामंत्री नितीन गुप्ता व प्रफुल्ल राजपुरोहित यांच्या वतीने लोकमान्य टिळक विद्यालय येथे करण्यात आले त्याप्रसंगी मार्गदर्शन करण्याकरीता सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. कल्पना गुलवाडे यांनी अरोग्या संबंधी मार्गदर्शन करीत तारुण्य वयात होणाऱ्या बदला संबंधी माहिती दिली तसेच आरोग्याच्या दृष्टीने निरोगी राहण्यासाठी मार्गदर्शन केले त्यानंतर पोलीस सायबर क्राइम ब्रांच चे संतोष पानघाटे यांचे मौलिक मार्गदर्शन झाले.या प्रसंगी महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांचे प्रासंगिक भाषण झाले, आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की खूप अभ्यास करून देश सेवा करण्यासाठी तयारी करावे असे त्यांनी यावेळी सांगितले सदर कार्यक्रमात माजी उपमहापौर अनिल फूलझेले, उपाध्यक्षा अरुण तीखे, माया मांदाडे, नगरसेविका वंदना तीखें, अनुराधा हजारे, शीतल आत्राम, किरण बुटले, सचिव रामकुमार अक्कापेल्लीवार, राजेंद्र खांडेकर, चंदन पाल, सारिका संदुरकर, रवि लोनकर, आंनद मांदाडे, सचिन कोतपल्लीवार, दिनकर सोमलकर, मनोरंजन रॉय, गिरिधर येडे, विनोद शेरकी यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य मंजूषा अडावदकर होत्या तर आभार आघाडी चे अध्यक्ष मोहम्मद जिलानी यांनी मानले तसेच चित्रकला स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थिनींना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.