Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ‘ई-संजीवनी ओपीडी’च्या माध्यमातून घरबसल्या मिळवा डॉक्टरांचा मोफत सल्ला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
‘ई-संजीवनी ओपीडी’च्या माध्यमातून घरबसल्या मिळवा डॉक्टरांचा मोफत सल्ला जिल्हयातील नागरिकांना लाभ घेण्याचे सीईओंचे आवाहन आमचा विदर्भ - ब्युरो ...

  • ‘ई-संजीवनी ओपीडी’च्या माध्यमातून घरबसल्या मिळवा डॉक्टरांचा मोफत सल्ला
  • जिल्हयातील नागरिकांना लाभ घेण्याचे सीईओंचे आवाहन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जनतेच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय टेली कन्सल्टेशन सेवेद्वारे ऑनलाइन ओपीडी सेवा सुरू केली आहे. नॅशनल टेलीकन्सल्टेशन सर्विसद्वारे रुग्णांना त्यांच्या आजारावर पाहिजे असलेला सल्ला किंवा मार्गदर्शन रुग्णालयात न जाता घरच्या-घरी मिळू शकणार आहे. त्यासाठी ई-संजीवनी ऑनलाइन ओ.पी.डी सेवा सुरू करण्यात आली आहे.
नागरीकांना सी-डॅक या संस्थेकडुन http://esanjeevaniopd.in या संकेतस्थळावरुन व गुगल प्ले-स्टोर मधुन ई-संजीवनी ओ.पी.डी. अॅप डाऊनलोड करुन त्याद्वारे थेट तज्ञ डॉक्टरांकडुन उपचार घेता येणार आहे. तसेच वयोवृध्द रुग्ण व ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेक नागरीकांना रुग्णालयात पोहचणे अवघड जाते, अशावेळी त्यांना घरी बसुनच वैद्यकिय सेवा उपलब्ध व्हावी याउद्देशाने ही सेवा सुरु करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त नागरीकांनी ह्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले आहे.
संकेतस्थळ किंवा अॅपद्वारे करा नोंदणी : नागरीकांना मोफत ऑनलाईन उपचार घेण्याकरीता http://esanjeevaniopd.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. तसेच मोबाईलद्वारे esanjeevaniopd हे अॅप गुगल प्ले-स्टोर वरुन डाऊनलोड करून नोंदणी करता येणार आहे.
डॉक्टरांचे मिळणार प्रिस्क्रीप्शन : या सेवेद्वारे तज्ञ डॉक्टरांनी उपचारांचा सल्ला दिल्यानंतर अॅपमध्ये किंवा संकेतस्थळावर त्वरीत औषधीचे प्रिस्क्रीप्शन उपलब्ध करण्यात येणार आहे. या प्रिस्क्रीप्शनची प्रिंट काटुन खाजगी मेडीकल किंवा शासकिय रुग्णालयातील औषधी विभागामधुन औषधी घेता येणार आहे.
ई-संजीवनी ओ.पी.डी.ची वेळ : ई-संजीवनी ओ.पी.डी. सकाळी 9.30 वाजेपासुन ते दुपारी 1 वाजेपर्यंत ऑनलाईन सुरु राहणार आहे. तर  दुसऱ्या सत्रात दुपारी 1.45 वाजेपासुन सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन सुरू राहील.  जिल्ह्यात ही सुविधा सर्व रुग्णांरीता मोफत करण्यात आली आहे. रुग्णांना मोफत सल्ला किंवा मार्गदर्शन देण्याकरीता महाराष्ट्र राज्यातून 2 हजार 753 डॉक्टर्स रजिस्टर करण्यात आले आहे. त्यामध्ये 58 तज्ञ डॉक्टर्स चंद्रपुर जिल्हयातील आहेत.
1800 आशाताई व त्यांचे समन्वयक, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी तथा ई-संजीवनी ओ.पी.डी करिता रजिस्टर असलेले 58 तज्ञ डॉक्टर यांच्या तांत्रिक अडचणीच्या निवारणाकरिता चंद्रपूर, जिल्हा रुग्णालयातील टेलीमेडिसिन सेंटरमधील फॅसिलिटी मॅनेजर दिपक खडसाने हे वरीष्ठांच्या मार्गदर्शनात काम बघतात.
जिल्ह्यातील रुग्णांना थेट तज्ञांची सेवा ई-संजीवनीमुळे घरबसल्या मिळत असल्याने जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top