Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: 3 जानेवारी पासून जिल्ह्यात जॅपनीज इन्सेफेलायटिस (मेंदूज्वर) लसीकरण मोहीम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
3 जानेवारी पासून जिल्ह्यात जॅपनीज इन्सेफेलायटिस (मेंदूज्वर) लसीकरण मोहीम पालकांनी 1 ते 15 वर्षे वयोगटातील पाल्यांना लसीचा डोस देण्याचे आवाहन...

  • 3 जानेवारी पासून जिल्ह्यात जॅपनीज इन्सेफेलायटिस (मेंदूज्वर) लसीकरण मोहीम
  • पालकांनी 1 ते 15 वर्षे वयोगटातील पाल्यांना लसीचा डोस देण्याचे आवाहन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
जॅपनीज इन्सेफेलायटिस (मेंदूज्वर) हा एक गंभीर, अपंगत्व होण्यास कारणीभूत असणारा आजार आहे. जॅपनीज इन्सेफेलाइटिस (मेंदूज्वर) विषाणूमुळे होतो. हा आजार दूषित डासांमुळे पसरतो. या आजारांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण फार अधिक असते.
या आजाराच्या सुरुवातीला 5 ते 15 दिवसांमध्ये विविध लक्षणे दिसू लागतात. थंडी वाजून ताप येणे, थकवा, डोकेदुखी, मळमळ, उलटी इत्यादी लक्षणे दिसून येतात. हा आजार मेंदूमध्ये पसरून गंभीर स्वरूप धारण करू शकतो. बऱ्याच रुग्णांमध्ये झटके, फिट येणे किंवा बेशुद्धपणा होऊ शकतो. हा आजार झालेल्या 30 टक्के रुग्णांमध्ये मृत्यू होण्याची शक्यता असते. साधारणत: 40 टक्के रुग्णांमध्ये आजारातून बरे झाल्यावर मेंदूला झालेल्या इजेमुळे लकवा व मतिमंदत्व असे आजार राहू शकतात. 1 ते 15 या वयोगटातील मुले व मुलींना हा आजार होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सुरुवातीला 1 ते 15 वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींचे एकाच वेळेस जे.ई. लसीच्या एका डोसने लसीकरण केले जाते. त्यानंतर नियमित लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत जे.ई. लसीचे दोन डोस, पहिला डोस वयोगट 9 ते 12 महिने व दुसरा डोस 16 ते 24 महिन्यापर्यंत दिले जातात.
ही मोहीम चंद्रपूर जिल्ह्यात 3 जानेवारीपासून सुरू होत असून 3 आठवड्याच्या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत 1 ते 15 वर्षे वयोगटातील जिल्ह्यातील एकूण 4 लक्ष 58 हजार 817 ग्रामीण, शहरी व महानगरपालिका क्षेत्रातील मुला-मुलींना या लसीचा एक डोस द्यावयाचा आहे. ही मोहीम पहिला आठवडा इयत्ता 1ली ते 10 वीच्या शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. व पुढील दोन आठवडे गावातील, वार्डातील अंगणवाडी समाजभवनमध्ये राबविण्यात येणार आहे.
या मोहीमेत देण्यात येणाऱ्या लसीचे नाव जेनवॅक असून ही लस भारत बायोटेक या संस्थेने निर्मिती केली आहे. ही लस सुरक्षित असून लस दिल्यानंतर काही बालकांमध्ये ताप, इंजेक्शनच्या ठिकाणी दुखणे, अंगावर पुरळ, किरकिर इत्यादी लक्षणे दिसू शकतात.
चंद्रपूर जिल्ह्यात 3 जानेवारी 2022 पासून जॅपनीज इन्सेफेलायटिस जे.ई. या आजाराच्या प्रतिबंधाकरीता लसीकरण मोहिमेला सुरुवात होत आहे. तरी, संपूर्ण जिल्ह्यातील पालकांनी आपल्या 1 ते 15 वर्षे वयोगटातील पाल्यांना या लसीचा डोस देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top