Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिप चंद्रपूर मार्फत राजुरा तालुक्यात विकासाचा झंझावात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिप चंद्रपूर मार्फत राजुरा तालुक्यात विकासाचा झंझावात चार्ली, चिंचोली, नोकारी तसेच भुरखुंडा (खु) येथे विकासकामांचे भूमिपूजन तथा लोकार्पण संप...
  • जिप चंद्रपूर मार्फत राजुरा तालुक्यात विकासाचा झंझावात
  • चार्ली, चिंचोली, नोकारी तसेच भुरखुंडा (खु) येथे विकासकामांचे भूमिपूजन तथा लोकार्पण संपन्न
  • सभापती सुनील उरकुडे यांचा पुढाकार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
दि.१४/१२/२१ ला जिप चंद्रपूर तर्फे राजुरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये भूमिपूजन तथा लोकार्पण करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रोशनी खान यांनी मनोगत व्यक्त केले त्यावेळी बोलतांना सभापती सुनील उरकुडे यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक कामे मार्गी लागले असून माझ्या अख्यत्यारीत येणारा निधी अंगणवाडी तसेच शाळांना प्राधान्य देत असून लहान मुलांना आणि स्तनदा मातांना उपयोगी पडत आहे याचे मला समाधान आहे तसेच पदावर असेपर्यंत मी शेवटपर्यंत विकासासाठी प्रयत्न करीत राहील असे शब्द दिले.
यावेळी चार्ली येथे अंगणवाडी चे लोकार्पण करण्यात आले तसेच आश्र्वासित कामांचे नियोजन करून लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे सभापती सुनील उरकुडे यांच्यामार्फत आश्वासन देण्यात आले.
चिंचोली (खू) येथे अंगणवाडी चे लोकार्पण तसेच वर्गाखोलीचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी सभापती सुनील उरकूडे यांनी बोलतांना हे माझे निर्वाचित क्षेत्र नसून पण लोकांचा जिव्हाळा बघता भरपूर निधी उपलब्ध करून दिला तसेच समोर पण आपल्या गावच्या विकासाकरिता माझा मौलाचा वाटा राहील असे सांगितले.
त्यानंतर नोकारी अंतर्गत गोवारिगुडा येथे अंगणवाडी चे लोकार्पण तथा जिप शाळेत पेव्हर ब्लॉक चे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सभापती बोलतांना आपल्या गावच्या अंगणवाडी बांधकाम करिता सभापती रोशनी खान यांचे मोलाचे योगदान असून नोकारी गावाला अतिशय उत्तम असे नेतृत्व वामन तुराणकर यांच्या माध्यमातून लाभले व त्यांच्या अथक प्रयत्नांनी आपल्या गावात विकासाची गंगा वाहायला लागली. त्यानंतर गोवारीगुडा येथील निराधार व अपंग व्यक्तीला  वॉटर कॅन चे वाटप करण्यात आले.
भूरखुंडा येथे अंगणवाडी चे लोकार्पण करण्यात आले आणि भूरखुंडा येथे मंजूर निधीचे नियोजन केले. व त्या गावातील युवा नेतृत्व अजय राठोड यांनी जिप चे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांची बांबूनिर्मित प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला..
या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने अध्यक्षस्थानी जिप कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे व उद्घाटिका म्हणून बालकल्याण व शिक्षा समितीच्या सभापती रोशनी खान, बांधकाम इंजिनिअर राजपूत, सटाले मॅडम, विस्तार अधिकारी मेश्राम साहेब, दीपक झाडे, संदीप पारखी, विलास खिरटकर, ओंकार आस्वले, चार्ली येथे गावचे सरपंच सुरेंद्र आवारी उपसरपंच नत्थू लोनगाडगे व गावचे नागरिक उपस्थित होते. चिंचोली येथे गावच्या सरपंच्या मडावी उपसरपंच विजय मिलमिले, ग्राप सदस्य अर्जुन पायपरे, महादेव हिंगणे तसेच गावचे प्रतिष्ठित नागरिक व शिक्षकवृंद उपस्थित होते. नोकारी गोवारी गुडा इथे भाजपा नेते वामन तुराणकर, सरपंच मॅडम, भोयर काका, तसेच गावचे प्रतिष्ठित नागरिक व शिक्षकवृंद आणि निराधार, अपंग व्यक्ती उपस्थित होते. भुरखुंडा इथे गावचे माजी सरपंच उपसरपंच तसेच युवा नेते अजय राठोड, संदीप दुर्गे, मधुकर राठोड तसेच गावचे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. चार्ली, चिंचोली (खू), नोकारी गोवारीगुडा, भुरखुंडा (खू) येथील नागरिकांनी आपल्या गावामध्ये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top