Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: दुर्लक्ष; लस घेतल्याने कोरोनामुक्तीचा अतिविश्वास, नागरिक बिनधास्त : मास्क-सॅनिटायझर वापरेना
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दुर्लक्ष; लस घेतल्याने कोरोनामुक्तीचा अतिविश्वास नागरिक बिनधास्त : मास्क-सॅनिटायझर वापरेना शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - जिल्...

  • दुर्लक्ष; लस घेतल्याने कोरोनामुक्तीचा अतिविश्वास
  • नागरिक बिनधास्त : मास्क-सॅनिटायझर वापरेना
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
जिल्ह्यात कोरोनाबाधिताची संख्या घटल्याने बिनधास्त झालेल्या नागरिकांची मास्क आणि सॅनिटायझरचा वापर कमी केला आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरची विक्री 85 टक्क्यांपर्यंत घटल्याचे औषध विक्रेत्यांनी सांगितले. कोरोनाची लस आपण घेतली असून आपण कोरोनामुक्त झालो, अशा अतिविश्वासात बिनधास्त झालेल्या नागरिकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर कमी केला आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ऑमिक्रोनने दस्तक दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचे संकट पूर्णपणे टळले नसून कोरोना पसरू नये म्हणून खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव व्हावा म्हणून मास्कचा वापर, वारंवार हाताला सॅनिटायझर लावणे, हात धुणे, सामाजिक अंतर राखणे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणे आदी उपाय वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून सांगितले जातात. मात्र, नागरिकांकडून या कोरोना प्रतिबंधक उपायांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान बहुतांश नागरिकांच्या हातात किंवा खिशात सातत्याने सॅनिटायझरची बाटली अथवा स्प्रे ठेवणाऱ्या नागरिकांनी आता सॅनिटायझर वापरणे कमी केले आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरच्या किमती कमी झाल्या आहेत. तरीही नागरिक या वस्तूंची खरेदी कमी प्रमाणात करताना दिसून येत आहेत.

मास्क-सॅनिटायझरच्या विक्रीत घट
मार्चमध्ये 100 टक्क्यांवर सुरू असलेली विक्री नोव्हेंबर महिन्यात 85 टक्क्यांपर्यंत खाली आली. त्यावेळी एन-95 मास्क तसेच सर्जिकल मास्क वापरण्याचे नागरिकांचे प्रमाण कमी झाले. पूर्वी 20 ते 40 रुपयांपर्यंत मिळणारा मास्क आता 15 ते 20 रूपयांना मिळत आहे. सॅनिटायझरचा वापर वाढलयाने सॅनिटायझर बॉटल, स्प्रे 50 रूपये, अर्धा लीटर 250 रूपये, पाच लीटर 1500 रूपये दर आकारले जात होते. आता कोरोनाची लाट ओसरल्याने त्याची मागणी घटली आहे.

मास्क लावणे गरजेचे
प्रशासनाने मास्क न घालणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली असली तरीही मास्क न घालता फिरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. लसींच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतरही संसर्ग होऊ नये, यासाठी मास्कचा वापर करणे गरजेचेच आहे. मास्क लावल्यामुळे तोटा काहीच नाही. केवळ कोरोना नव्हे तर इतर कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य आजारांना दूर ठेवण्यासाठी मास्क उपयुक्त आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top