- उपोषणकर्त्याची तब्येत खालावली ; राजुरा सामान्य रुग्णालयात दाखल
- कामगारांचा अंत पाहू नका - उमेश राजूरकर
- उपोषणाचा पाचवा दिवस
विरेंद्र पुणेकर आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
पोवनी II येथे सुरू असलेल्या आमरण उपोषण कर्त्याची प्रकृती बिघडल्याने कामगारांचा अंत पाहू नका? नाहीतर साखरी, निमणी, चिंचोली, हिरापूर, पोवणी सर्व गावाच्या वतीने कंपनीच बंद पाडू असे आवाहन निमणी ग्रामपंचायतचे उपसरपंच उमेश राजूरकर यांनी केले.
वेकोलिच्या पोवनी II कोळसा खाणीत माती काढण्याचे काम करणाऱ्या सी.एम.पी.एल. कंपनीत नोव्हेंबर १ पासून कंत्राटी कामगारांच्या वतीने सकाळपासून विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. आजचा पाचवा दिवस असून सुद्धा कंपनीला जाग आली नाही
राजुरा तालुक्यातील पोवनी II कोळसा खाणीत कोळसा खाणीतून माती व कोळसा काढण्याचे कंत्राट सी.एम.पी.एल. या खासगी कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीत परप्रांतीय कामगारांचा मोठ्या प्रमाणात भरणा केला आहे. नियमांना डावलून ही कंपनी कामगारांवर अन्याय करीत आहे. कामगारांच्या वेजबोर्ड निसार कंपनीने वेतन द्यावे, कामगारांच्या खात्यात कंपनीने वेतन करावे, वेतन स्लीप द्यावी, दिवाळी बोनस द्यावा, यासारख्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी सी.एम.पी.एल. कंपनीत काम करणाऱ्या प्रफुल्ल गौरकर, अमित जगताप, शेखर पाचभाई, प्रवीण लोनगाडगे, किसन मडावी, अनिल शेंडे, विशाल इटकेलवार, श्रावण तेलकापल्लीवर, चिंटू जेऊरकर, सुदर्शन देवाळकर, शरद टाेंगे, किरण राजनवार, विजय नेवलकर, गजानन हनुमंते, प्रकाश अत्राम, नितेश चतुलवार, गुरुदास मडचापे, प्रकाश कोडापे, सुनील लांडे, प्रमोद थिपे व इतर प्रकल्पग्रस्त गावातील कामगारांनी पोवनी II कोळसा खाणीत माती काढण्याचे काम करणाऱ्या सी.एम.पी.एल. कंपनीसमोर कामबंद आंदोलन केले.पर्यंत कंपनी कामगारांच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा पवित्रा कामगारांनी घेतला.
आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे एका कामगारांची तबेत बिघडली असून सामान्य रुग्णालय राजुरा येथे दाखल केले जोपर्यंत कामगारांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील.अमित जगतापकंत्राटी कामगार पोवनी II
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.