- परिसरातील शेतकऱ्यांची मागणी; महामार्ग प्रकल्प संचालकांना दिले निवेदन
- भर टाकून महामार्ग उंच केल्यास राजुरा शहरातील खालच्या भागात पुराचा धोका वाढणार - नगर सेवक राजू डोहे
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
बामणी ते लक्कडकोट राष्ट्रीय महामार्ग क्र. ९३० ( डी ) या महामार्गावरील वर्धा नदीच्या समोरून राजुरा शहराच्या बाहेरून महामार्गाचे बांधकाम होणार आहे. सदर बायपासचा भाग कोतपल्लीवार पेट्रोल पंम्पापासुन ते नक्षत्र लॉनच्या मागच्या बाजुपर्यंत पुरबुडीत क्षेत्रात आहे. मात्र हा भाग वर्धा नदीच्या पुराच्या बॅकवाटरमुळे नेहमी बुडत असतो परंतु या परिसरातून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने नदीचे पुरामुळे येणारे पाणी अडवून राजुरा शहरातील खालच्या परिसर जलमय होणार असून याचा त्रास भविष्यात राजुरा व परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.
हा भाग पुरबुडीत असल्याबाबतची नोंद संबंधीत विभागाच्या रेकार्डला आहे. पुरात बुडणारा हा भाग काळ्याभोर शेताजमीनीचा असून पुरात बुडणाऱ्या भागाच्या भुपृष्ठावरून मातीचा भराव टाकुन चार पदरी मार्गाचे बांधकाम करणार आहे. हे काम या परिसरातील शेतकरी व शहरवासीयांकरीता अत्यंत चुकीचे व घातक ठरणार आहे . सदर बायपास करीता टाकलेल्या भरावामुळे एक मोठी पाळ (बांध) तयार होवून या पाळीला पुराचे पाणी अडुन राजुरा भागात कुत्रीम पुर परिस्थिती निर्माण होवून शेत जमीन, मालमत्ता व जिवीत हानी होणार आहे. पुरात बुडणाऱ्या भागातून भुपृष्ठावरून मातीचा भराव टाकुन रस्ता बांधकाम केल्यास भविष्यात पश्चातापाशिवाय काहीच राहणार नाही. बायपास रोड जात असलेल्या परिसरात राजुरा-बल्लारपूर रोड लगत पावसाळ्याच्या दिवसात समुद्रासारखे अफाट पाणी पसरलेले असते या परिसरात पुराचे पाणी येत असल्याने संबंधित विभागाने ले-आऊट धारकांना परवानगी नाकारली आहे, असे असताना या परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे पुराचे पाणी अडून संपूर्ण परिसर जलमय होणार आहे. हि बाब परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्याकडे निवेदन देऊन सदर बाब लक्षात आणून दिली. निमकर यांनी पूरग्रस्त भागातुन उड्डाणपूल तयार करण्यासंबंधी विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबत चर्चा करून त्यांच्या मार्फतीने, केंद्रीय मंत्री महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी, जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग, प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्याकडे निवेदन दिले आहे. नगर सेवक राजू डोहे यांनीही भर टाकून महामार्ग उंच केल्यास राजुरा शहरातील खालच्या भागात पुराचा धोका वाढणार असून राष्ट्रीय महामार्गातील पूरग्रस्त भागात भरण न टाकता उड्डाणपुलाचे बांधकाम करा अशी मागणी केली आहे.
बांधकाम करण्यात येणाऱ्या बायपास रोडचे काम कोतपल्लीवार पेट्रोल पंप ते राजुरा-चुनाळा रोड क्रासींगवर घेण्यात येणाऱ्या अंडरपास पुलापर्यंत घेणे आवश्यक आहे. उड्डान पुलाचे बांधकामा ऐवजी भुपृष्ठावरून भराव टाकुन बांधकाम करणार असल्यास येथील जनता तिव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदन शिष्टमंडळाद्वारे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांना देण्यात आले. यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर, नगरसेवक राजू डोहे, राजकुमार भोगा, हरी झाडे, संजय पावडे, सचिन खोके, भिमराव कोरडे, उमेश ठक, मेघनाथ खोके, संदेश पडगेलवार व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.