Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आमदारांच्या स्वीय सचिवाने घुग्घुस पीएचसीचे बांधकाम थांबवले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भूमिपूजन केल्याशिवाय काम न करण्याचे आदेश आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपुर - औद्योगिककरणात अग्रेसर व जिल्ह्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर...




























  • भूमिपूजन केल्याशिवाय काम न करण्याचे आदेश
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपुर -
औद्योगिककरणात अग्रेसर व जिल्ह्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर असलेल्या घुग्घुस येथे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र स्थानीय आमदाराच्या स्वीय सचिवाने भूमिपूजन न करता सुरू केलेले काम बंद पाडले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याने दिलेल्या या पत्रामुळे केवळ स्वस्त लोकप्रियतेसाठी रुग्णालयाचे काम बंद पाडल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर घुग्घुस येथील ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरू झाले. पिल्लर्ससाठी खड्डे खोदण्याचे कामही सुरू झाले होते. परंतु अवघ्या तीन तासानंतरच येथील काम बंद करण्यात आले. यासंदर्भात ठेकेदार आणि घुग्गुस रुग्णालय प्रशासनाकडून आमदारांच्या स्वीय सचिवाचा फोन आल्याचे सांगण्यात आले. त्या फोन मुळे काम बंद पडल्याचे बोलल्या जात असतानाच पीडब्ल्यूडी विभागाने याबाबतचे पत्र दिल्यानंतर याला दुजोरा मिळाला. मात्र केवळ भूमिपूजनाची औपचारिकता पूर्ण करायची की भूमिपूजनाच्या वेळी फोटो काढून आमचा प्रयत्नाने हे झालं यासाठी काम थांबवायचे, असा प्रश्न घुग्गुसवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस औद्योगिक शहराची लोकसंख्या 50,000 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे घुग्गुसला नगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. 30 खाटांच्या क्षमतेच्या घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा काढली आहे. एकूण रुपये 
11,17,10,000 पहिल्या टप्प्यातील कामासाठी 8,07,91,481 रुपयेचा निधी मंजूर करून पीडब्ल्यूडी विभागाने ठेकेदारामार्फत 11 नोव्हेंबर पासून कामाला सुरुवात केली. परंतु केवळ आमदारांच्या हस्ते भूमिपूजन न झाल्यामुळे तीन तासांनंतरच सदर ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम ठप्प झाले. 
सामाजिक कार्यकर्ते इबादुल हसन सिद्दीकी हे घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाशी सातत्याने पत्रव्यवहार करत होते. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे 9 जून 2014 ला तत्कालीन महाराष्ट्र शासनाने 30 खाटांचे घुग्घुस ग्रामीण रुग्णालय मंजूर केले होते. 24 ऑक्टोबर 2018 ला राज्याच्या आरोग्य विभागातर्फे घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी 11.17 लक्षचा प्रस्तावाला मंजुरी दिली होती. आता पहिल्या टप्प्याचा निधी मिळाल्यानंतर काम सुरू झाल्यानंतर केवळ भूमिपूजनाच्या निमित्ताने आमदाराच्या स्वीय सचिवाने काम बंद पाडणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

प्रोटोकॉलचे उल्लंघन
यासंदर्भात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वीय सचिव ललित कासट यांना विचारले असता त्यांनी ठेकेदाराला रुग्णालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले आहे का, अशी विचारणा केली. आमदारांच्या कार्यक्षेत्रात कोणतेही विकासकाम होत असेल तर त्याची माहिती आमदारांना न देणे म्हणजे प्रोटोकॉलचे उल्लंघन आहे. त्यामुळे सध्या काम थांबविण्यात आले आहे. लवकरच पालकमंत्री व जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत भूमिपूजन झाल्यानंतर रुग्णालयाच्या कामाला सुरुवात होणार आहे. कारण घुग्गुस पीएचसीचे काम सुरू करण्याबाबत सीएसलाही माहिती नव्हती.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top