धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
दालमिया सिमेंट वर्कर कंत्राटी कामगार संघ विविध मागण्यासाठी दिनांक 7 नोव्हेंबर 21 पासून नारंडा येथील दालमिया सिमेंट व्यवस्थापनाच्या विरोधात आंदोलनला सुरूवात करण्यात आली होती. सहा दिवस उलटूनही अजून पर्यंत प्रशासनाने कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू केलेली नाही किंवा चर्चा करण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाही.
कामगारांनी आपल्या मागण्या त्वरित मान्य करण्यात यावे यासाठी दिनांक 7 नोव्हेंबर 21 पासूनच साखळी उपोषनाला सुरुवात केली. यात मुरली सिमेंटच्या जुन्या कामगारांना पुर्व पदावर त्वरित कामावर घेण्यात यावे, लोडींग विभागातील परप्रांतीय कामगारांना वगळून जुने व स्थायी लोडिंग कामगारांना घेण्यात यावे, प्रकल्पग्रस्त व जुन्या कंत्राटी कामगारांना पूर्ववत कामावर घेउन इतर उद्योगाप्रमाणे सिमेंट वेज बोर्ड लागू करण्यात यावे, सर्व कामगारांना कॅन्टीन मधे नास्ता, जेवण व कामावर येण्या जाण्यासाठी वाहनाची सुविधा देण्यात यावी, सिमेंट लोडिंग विभागातील व इतर सिमेंट उद्योगात काम करणाऱ्या स्थानिक कामगारांना वेजबोर्ड नुसार 1350 रू. रोजी तथा इतर सुविधा देण्यात यावी. कामावर घेताना स्थानिक कामगारांना प्राध्यान्य देण्यात यावे. अश्या विविध मागण्या घेऊन येथील कामगार उपोषणकर्ते उत्तम उपरे, निलेश भोयर, श्रीनिवास गाडगे, शंकर आदोडे, संजय दुबे, अशोक निकोडे, भारत ठाकरे, मनोज काटवटे, राहुल तेलंग, नानाजी येरेकर, गणेश गुरणुले, बाळू गावरे कवडू चूनारकर इत्यादी बेमुदत साखळी उपोषणास बसले आहे. साखळी उपोषणाला सहा दिवस उलटूनही कंपनी व्यवस्थापनाशी कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू झाली नाहीं आहे. त्यामुळे ह्या आंदोलनाचे पुढे काय स्वरूप होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.