Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वाढत्या महागाई विरोधात बल्लारपूरात शिवसेनेचे मुंडन आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महागाईच्या विरोधात बैलगाडी ने जुलुस काढून तहसीलदारानां निवेदन संतोष दीक्षित - प्रतिनिधी बल्लारपूर - देशातील वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेने...
  • महागाईच्या विरोधात बैलगाडी ने जुलुस काढून तहसीलदारानां निवेदन
संतोष दीक्षित - प्रतिनिधी
बल्लारपूर -
देशातील वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बल्लारपुर शिवसेना तर्फे आज वाढत्या पेट्रोल, डिझेल, गैस सिलेंडर, खाद्यतेल, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती विरोधात केंद्रातील मोदी सरकारचा विरोधात स्थानिक नप परिसरात लाकडी चुलीवर पोळी शेकत महागाई विरोधात पथनाट्य सादर करून, भाजनाद्वारे केंद्र सरकारचा निषेध करत तसेच 25 शिवसैनिकांनी मुंडन करून निषेध नारेबाजी व आंदोलन करत निषेध नोंदविला. 
आंदोलन शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे, उपजिल्हा प्रमुख व नगरसेवक सिक्की यादव, युवा सेनाचे प्रदीप गेडाम यांच्या उपस्थितीत तसेच शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना व शहर प्रमुख समन्वयक बाबा शाहू, शहर समन्वयक अधि. प्रणय काकडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. 
आंदोलनात प्रामुख्याने शिवसेनेचे प्रभाकर मुरकुटे, अनुदान योजना समिती सदस्य शेख युसूफ, परिक्षीत अलोने, माजी नगरसेवक ओमप्रकाश राऊत, मुन्ना, दिनेश लिचोडे, उमेश कुंडले, जीवन बुटले, ऑटो युनियनचे अब्बास भाई, आंनद हनमंतु, बॉबी कादासी, सुरेंद्र संधू, रामू मेदरवार उप शहर प्रमुख, सोनु श्रीवास युवासेना, सौ. कल्पना गोरघाटे महिला उप जिल्हाप्रमुख, सौ. सुवर्णा मुरकुटे महिला तालुका प्रमुख, सौ. ज्योती गेहलोत महिला शहर प्रमुख, सौ. रंजीता बीरे नगरसेविका बल्लारपुर शिवसेना, मीनाक्षी गलघट, अंजली सोमबंसी, प्रगती झुल्लारे, सौ. निलीमा पाठक, प्रतिभा तेलतुम्बडे, संगीता यादव सह शेकडो महिला शिवसैनिक सह नागरिकही उपस्थित होते. आंदोलनाअंती बैलगाडी ने जुलुस काढून महागाई च्या विरोधात तहसीलदारानां निवेदन देण्यात आले. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top