Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: BMS वर्धाव्हॅली, चंद्रपूर-बल्लारपूरचे 36 वे अधिवेशन संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अधिवेशनात सात ठराव मंजूर ; नवीन कार्यकारिणीची ही घोषणा आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर - भारतीय कोळसा खाण कामगार संघ, वर्धा व्हॅली, ...
  • अधिवेशनात सात ठराव मंजूर ; नवीन कार्यकारिणीची ही घोषणा
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
भारतीय कोळसा खाण कामगार संघ, वर्धा व्हॅली, चंद्रपूर/बल्लारपूर यांचे 36 वे वार्षिक अधिवेशन 21 ऑक्टोबर 21 रोजी शक्तीनगर कॉलनी दुर्गापूर येथील ऑडिटोरियम सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी रमेश मुफकलवार हे होते. प्रमुख उपस्थितीत बीएमएस विदर्भ प्रदेश अध्यक्ष श्रीमती शिल्पा देशपांडे, महामंत्री सुधीर घुरडे,
संघटन मंत्री अशोक मिश्रा, कोषाध्यक्ष सुनील मिश्रा, उपाध्यक्ष विवेक अल्लेवार, उपाध्यक्ष गंगाधर ठाकरे, सेवानिवृत्त कोळसा कामगार संघटनेचे अध्यक्ष शम्भु विश्वकर्मा, बीएमएस चंद्रपुर अध्यक्ष अशोक मांडवकर इत्यादी गणमान्य प्रामुख्याने उपस्थित होते. अधिवेशनात ३०० हुन अधिक सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. बीएमएसचे सरचिटणीस जोगेंदर यादव यांनी कार्यक्रमाचे संचालन करत सरचिटणीसांचा अहवाल वाचून सभागृहासमोर ठेवला. सभागृहात सदर प्रस्तावाला भारत माता की जयच्या घोषणेने एकमताने मंजूर देण्यात आली. कोषाध्यक्ष किशोर घाटोळे यांनी मिळकतीचा खर्च ठेवला त्याला सुद्धा एकमताने मंजुरी देण्यात आली. शिल्पा देशपांडे, सुधीर घुरडे, अशोक मिश्रा यांनी सभागृहात उपस्थित सदस्यांना संबोधित केले. संस्थेचे कामकाज, कामगार निर्मिती, संस्थेचे धोरण, महिलांचा सहभाग, महिला सक्षमीकरण, वेतन सेटलमेंट, सामाजिक जबाबदारी अंतर्गत केलेले काम, आंदोलनात्मक कार्यक्रम आणि इतर विषयांबाबत माहिती देण्यात आली. 
शेवटच्या सत्रात कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश मुफकलवार यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना जुनी कार्यकारिणी बरखास्त करत नवीन कार्यकारिणीची घोषणा केली. शिल्पा देशपांडे यांनी निवडणूक अधिकारीची जवाबदारी सांभाळली. त्यानंतर नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यात अध्यक्ष नामदेव देशमुख, कार्याध्यक्ष बादल गर्गेलवार, उपाध्यक्ष सचिन हनुवते, हनुमन्तु भंडारी, महामंत्री जोगेन्दर यादव, संयुक्त महामंत्री रंजीत पटले, मंत्री अनिल निब्रड, व्ही. गोपीकृष्ण, कोषाध्यक्ष देवीदास थिपे, सह कोषाध्यक्ष अनंत दिल्लीकर, कार्यालयमंत्री अंकित धनोरिया, आनंद पाटिल, 
संगठन मंत्री प्रमोद कोल्हे, राकेश श्रीवास्तव, प्रचार प्रसार प्रमुख राजू मालगुरु, प्रवीण मुनगंटीवार, महिला प्रतिनिधी सुवर्णलता बोंडे, विजया पिका, प्रेमिला श्रीरामे, शारदा रेवेल्ली, भाग्यश्री कायते, विशेष आमंत्रित दिलीप सातपुते, शांताराम वांढरे, पि.बी. पाटील, रमेश मुफ़कलवार यांची नियुक्ती करण्यात आली. अधिवेशनाला तन, मन, धनाने यशस्वी करण्यासाठी निष्ठावान कामगारांच्या कठोर परिश्रम आणि सहकार्याबद्दल मनापासून कृतज्ञता आभार नामदेव देशमुख यांनी व्यक्त केले. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top