- तेजस्विनी बहुउद्देशिय संस्था, मारडाचे आयोजन
राजुरा -
तेजस्विनी बहुउद्देशिय संस्था, मारडा या संस्थेच्या वतीने दिनांक 24 ऑक्टोबर 2021, रोज रविवारला 'युगस्पंदन 'काव्यसंग्रहाचे प्रकाशन व राज्यस्तरीय तेजस्विनी साहित्य पुरस्कार वितरण आणि कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. चुनाळा मार्गावरील स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला नागरिक व साहित्यप्रेमीनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या संघटीका संगीता धोटे, संस्थाध्यक्ष अनिल धोटे यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार संघ भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत केले.
दिनांक 24 ऑक्टोबरला होणार्या या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार सुभाष धोटे आहेत. उद्घाटन सकाळी १०.३० राजुरा नगराध्यक्ष अरुण धोटे यांचे हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध साहित्यिक अशोक पवार, समीक्षक व प्रसिद्ध साहित्यिक डॉ.अनंता सूर, कवी व समीक्षक डॉ.बळवंत भोयर, श्रीमती सुमनताई मामुलकर, कवयित्री डॉ.विशाखा कांबळे,नागपूर, मनोज बोबडे, नंदा अल्लुरवार, उमाकांत धांडे, ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे, अश्विनी खोब्रागडे, जिल्हा परिषद सदस्या मेघा नलगे, पंचायत समिती सभापती मुमताज अब्दुल, सविता कोठ्ठी इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात कवयित्री संगीता धोटे संपादित "युगस्पंदन" काव्यसंग्रह प्रकाशित होणार असून राज्यस्तरीय तेजस्विनी साहित्य पुरस्कार 2019 व 2020 चे वितरण होणार आहे. या वर्षी माजी राज्यमंत्री स्व.वामनराव गड्डमवार स्मृतीप्रित्यर्थ कथासंग्रह पुरस्कार विलास सिंदगीकर "बाजार" (केकतसिंदगी) व प्रमोद पिवटे - "मेळावा", (मुक्ताईनगर) यांना देण्यात येणार आहे. स्व.हनुमंत चिल्लावार स्मृतीप्रित्यर्थ कादंबरी पुरस्कार प्रमोद चोबितकर, अमरावती यांना भणंग व डॉ. विद्याधर बन्सोड यांना मुक्काम पोस्ट तेढा या साहित्य कृतीबद्दल प्रदान करण्यात येणार आहे. माजी आमदार स्व.रामचंद्रराव धोटे स्मृतीप्रित्यर्थ गजलसंग्रह पुरस्कार प्रफुल भुजाडे "मनाचा मौन दरवाजा" (अमरावती) डॉ. धनराज खानोलकर - "मास्तर मातीचे" (चंद्रपूर) माजी आमदार स्व. प्रभाकरराव मामुलकर स्मृतीप्रित्यर्थ काव्यसंग्रह पुरस्कार कवी इरफान शेख "माझ्यातला कवी मरत चाललाय'' (चंद्रपूर), श्रीमती शांताबाई गावंडे यांचेकडून स्व. वाघुजी गावंडे स्मृतीप्रित्यर्थ बालकाव्यसंग्रह पुरस्कार सौ. मालती शेमले "बाग आम्हा मुलांची" (गडचिरोली) यांना प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात कवीयत्री चित्रालेखा धंदरे, राजुरा व सामाजिक कार्यकर्ता व शिक्षक हिनेश जाधव, जिवती यांना सन्मानित करण्यात येणार आहे. कवी संमेलन दुपारी दोन वाजता कविसंमेलन होणार असून याचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध कवी डॉ.किशोर कवठे भूषविणार असून विशेष उपस्थिती कवी प्रदिप देशमुख व कवी रोशनकुमार पिलेवान राहणार आहे. सुत्रसंचालन कवी नरेशकुमार बोरीकर करणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी अनिल धोटे, अंजुमन शेख, सुमित्रा कुचनकर, योगिता भोयर, मयुरी मेश्राम यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संगीता अनिल धोटे संस्थापक, तेजस्विनी बहुउद्देशिय संस्था, मारडा, श्रीमती कल्पना अविनाश थेरे, ज्योत्स्ना संतोष धोटे, माया लहू भोयर, शिला धर्मेंद्र वनकर, मंगला अनिल पिंपळकर, सविता सुनिल पिंपळकर, सविता विलास हिवरकर, कु.अनिता मारोती मडावी यांच्यासह संस्थेचे सर्व सदस्य परिश्रम करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.