- कापसाला ७०११ रुपये देण्यात आला भाव
राजुरा -
शेतकऱ्यांच्या कापसाचे योग्य मोजमाप, योग्य भाव व नगदी चुकारा देणाऱ्या राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी येथील आशीर्वाद कोटेक्स जिनिंग, प्रेसिंग अँड ऑइल मिल मध्ये आजपासून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम कापूस घेऊन येणारे सघनशील शेतकरी एकनाथ उरकुडे, बाबा राऊत, सुधाकर येल्लुरे, भिवसन डंभारे, रवींद्र येलमुले इत्यादी शेतकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. शेतकऱ्यांनी आणलेल्या कापसाला ७०११ रुपये भाव देण्यात आला. यावेळी जिनिंगचे संचालक अंकित मणियार, दीपक झंवर, राहुल झंवर, नवल झंवर, झुंबरलाल मणियार उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.