Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: विजय क्रांति कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने अल्ट्राटेक कंपनीत गांधीगिरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गांधीजीच्या अहिंसेच्या मार्गाने अस्थायी कामगारांनी केले काळ्या फिती लावून विरोध प्रदर्शने  कामगारांना नवीन वेळापत्रक मान्य नाही कॅन्टीनमध्ये...
  • गांधीजीच्या अहिंसेच्या मार्गाने अस्थायी कामगारांनी केले काळ्या फिती लावून विरोध प्रदर्शने 
  • कामगारांना नवीन वेळापत्रक मान्य नाही
  • कॅन्टीनमध्ये सवलत दरावर जेवणाची व्यवस्था करा
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
विजय क्रांति कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने ठेकेदारी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करे पर्यंत सर्व कंत्राटी कामगार दिनांक ८ ऑकटोबर पासून राष्ट्रपिता माहात्मा गांधीजीच्या अहिंसेच्या मार्गाने कामावर काळी पट्टी लावुन व्यवस्थापनाचा विरोध प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. असे विजय क्रांति कंत्राटी कामगार संघटनेचची अध्यक्ष शिवानी विजय वडेट्टीवार यांनी यूनिट हेड अल्ट्राटेक सीमेंट लिमिटेड आवाळपूर यांना एका निवेदनद्वारे सांगितले आहे.
विजय क्रांति कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने ठेकेदारी कामगारांच्या विविध मागण्या अल्ट्राटेक व्यवस्थापना करण्यात आली आहे. जनरल शिफ्ट मध्ये जेवण्याच्या वेळेत मध्ये जो बदल करण्यात आला आहे तो बदल कामगारांना विचारात न घेता हुकूमशाही पद्धतीने घेण्यात आला आहे. या बदलेल्या वेळे चा त्रास आवाळपुर, नोकारी, नांदा, बिबी येथील ठेकेदारी कामगारांना होणार आहे आणि यामुळे कामगारामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. असंतोष दूर करण्यासाठी UTCL कंपनीने कामगारांना येण्या - जाण्या साठी बसची सुविधा उपलब्ध करून द्यावी अथवा अंबुजा सीमेंट, एसीसी सीमेंट व आपल्या ग्रुप मध्ये माणिकगढ सीमेंट मध्ये ज्या प्रकारे कामगारांना जेवणाची व चहा नास्त्याची सुविधा उपलब्ध आहे त्या प्रमाणे उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आले आहे. 
शासनाच्या नियमांनुसार कंपनी मध्ये 90 दिवस काम केल्यास पगारी सुट्टी (PL) मिळायला पाहिजे. ती सुट्टी ट्रान्सपोर्ट चे ठेकेदार प्रत्येक वेळेस सांगून सुद्धा अजूनही त्या सुविधा कामगारांना मिळाल्या नाही. MINES विभागातील ठेकेदारी कामगारांच्या पगाराबाबत नागपुर येथे श्रमाआयुक्त केंद्रीय यांच्या समोर व विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या समोर चर्चा झाली व व्यवस्थापनाने सुद्धा ते कबूल केले परंतु 90 दिवस होवून सुद्दा काही सुधारणा न झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 
विजय क्रांति कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने ठेकेदारी कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात कामगार आयुक्त चंद्रपुर यांच्या कडे द्विपक्षीय चर्चेचे  आयोजन करण्यात आले होते, परंतु अल्ट्राटेक प्रशासनाने बैठकीत गैरहजर राहून कामगारांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत करण्याचा आरोपही करण्यात आला आहे. 
कंपनीने १ ऑकटोबर पासून जनरल ड्यूटीच्या वेळापत्रकामध्ये बदल केला आहे. हा निर्णय एकतर्फी निर्णय आहे व त्या निर्णया विरुद्ध स्थायी व अस्थायी कामगारांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. त्या नुसार बदललेल्या वेळापत्रकात संदर्भात कामगारांना कॅन्टीन मधे जेवणाची व चहा नाश्त्याची व्यवस्था करून द्यावी अन्यथा नविन वेळापत्रक मान्य नाही असे स्पष्ट सांगितले आहे. कंत्राटी कामगारांना युनिफॉर्म देण्याची मागणीही केली आहे. कंपनी प्रशासनाने यावर अजूनपर्यंत काहीच स्पष्ट केले नाही. हा सर्व प्रकार बघता विजय क्रांति कंत्राटी कामगार संघटनेने दिनांक ८ ऑकटोबरपासून गांधीजीच्या अहिंसेच्या मार्गाने काळ्या फिती लावून अस्थायी कामगार विरोध नोंदवित आहे. 
गेल्या 30-35 वर्षांपासून एल अँड टी आणि आता अल्ट्राटेक कॅन्टीनमध्ये फक्त कंपनी रोलवर काम करणाऱ्या लोकांना सवलतीच्या दरात जेवण पुरवतात आम्हाला पैसे देऊन घ्यायचे आहे, तरीही आम्हाला ते दिले जात नाही, असा भेदभाव का? कंत्राटी कामगार त्यांच्याच देशात भेदभावाला बळी पडत राहतील का? पॉकेट युनियनच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांचे शोषण किती काळ सहन केले जाणार आहे?
दशरत राऊत, उपाध्यक्ष - विजयक्रांती युनियन















Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top