- बळीराजाच्या अंगावर गाड्या घालून चिरडणाऱ्या केंद्र सरकारचा जाहीर निषेध
- लखीमपुरच्या शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (महाआघाडी) तर्फे दि.11 ऑक्टो. ला "महाराष्ट्र बंद" !
- "बबन उरकुडे" शिवसेना राजुरा विधानसभा समन्वयक यांचे बंद ला सफल करण्याचे जाहीर आवाहन
राजुरा -
दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश व संपूर्ण देशातील शेतकरी केंद्रातील सरकारने शेतकरी विरोधी जे कृषी कायदे केले आहे, ते "काळे कायदे" रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील ९ महिन्यांपासून थंडी उन, पावसात घरदार सोडून रस्त्यावर उतरला आहे, परंतु केंद्रातले सरकार शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या मान्य करण्या ऐवजी शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी आंदोलकांच्या वाटेत काटेरी तारेचे कुंपण, अश्रुधुर, कडकडत्या थंडीत पाण्याचा मारा, गोळीबार असे घृणास्पद प्रकार करीत आहे, आता तर शांतीने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भरधाव वेगाने गाड्या चढवून शेतकऱ्यांना ठार मारण्याचा प्रकार उत्तर प्रदेशात लखीमपुर इथे घडला.
लखीमपुरच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ राज्यातील 'महाआघाडी सरकारच्या' सर्व घटक पक्षांनी "केंद्र सरकारच्या" शेतकरी विरोधी व अश्या हत्याकांडाचा निषेध करण्याचा निर्णय घेतला व त्याच अनुषंगाने येत्या सोमवारी ११ ऑक्टोंबर ला संपूर्ण "महाराष्ट्र बंद" चे आवाहन करण्यात आले आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर संदीपभाऊ गिऱ्हे यांचे मार्गदर्शनात सोमवारी ११ ऑक्टोंबर ला महाविकास आघाडीच्या शिवसेनेच्या वतीने भवानी दुर्गा उत्सव मंडळ राजुरा येथून सकाळी ठिक ९.३० बाईक रॅली काढून भारत बंद हाकेत शामिल होण्याचे आवाहन शिवसेना राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे, शिवसेना शहर प्रमुख निलेश गंपावार, शिवसेना राजुरा उपतालुका प्रमुख रमेश झाडे, शिवसेना राजुरा तालुका समन्वयक वासुदेव चापले, युवासेना उपतालुका प्रमुख अमित उर्फ बंटी मालेकर यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.