- तेंदूपाने मजुरांच्या आंदोलनाला यश
राजुरा -
तेंदुपाने संकलन करणाऱ्या मजुरांना त्वरित बोनस देण्यात यावा या प्रमुख मागणीसह अन्य काही मागण्यांकरिता अँड. मारोती कुरवटकर यांच्या नेतृत्वात तेंदुपत्ता मजूर संघटनेच्या झालेल्या आंदोलनाला यश मिळाले असून सन 2019 चा बोनस मजूरांना शासनाने नुकताच मंजूर केला आहे.
राजुरा तालुक्यात तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना सन 2019, 2020 आणि 2021 या तीन वर्षातील थकीत बोनस त्वरित प्रदान करण्यात यावा, वन्यप्राण्यांपासून शेतपिकाचे होणारे नुकसान थांबवण्यात यावे, याकरता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात आणि वन्य प्राण्यांपासून झालेल्या नुकसानग्रस्त शेताचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी, या मागणीसाठी तेंदुपत्ता मजूर संघटनेच्या माध्यमातून वन विभागाच्या कार्यालयापुढे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री तसेच राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सुद्धा पाठवण्यात आले होते. शासनाने या आंदोलनाची दखल घेत तेंदूपत्ता मजुरांची मागणी मान्य केली असून सन 2019 चा बोनस प्रदान करण्यात मंजुरी दिली आहे. त्यामुळे तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
मात्र अद्यापही शासनाने सन 2020 आणि 2021 या वर्षातील थकीत बोनस देण्यास मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे या दोन वर्षातील थकीत बोनस लवकर द्यावा अन्यथा पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा अँड. मारोती कुरवटकर, प्रेमसागर राऊत, बंडू चहारे, विकास देवाळकर, प्रदीप बोबडे, संतोष अलोने, अरुण डंभारे, अर्जुन अलगमकर, बाल्या वांढरे, गुलाब चहारे, शेख नूरजहा, शिवणकर, कल्पना राऊत, कुसुम वांढरे, निर्मला सुमरकर, शोभा वडस्कर, कविता चांदेकर, कुसुम टेकाम, संगीता वडस्कर, कौसल्या मडावी, बेबी राऊत, शोभा सिडाम, रंजना घोंगे यांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.