- आमदार किशोर जोरगेवार यांच्या आंदोलनानंतर वेकोलि प्रशासनाने केली २११ पदांची जाहिरात प्रसिध्द
चंद्रपूर -
आमदार किशोर जोरगेवार यांच्या आंदोलनानंतर वेकोली प्रशासनाने २११ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामूळे मायनिंगचे शिक्षण घेवूनही रोजगाराच्या प्रतिक्षेत असलेल्या युवकांना वेकोलि मध्ये नौकरीची संधी प्राप्त झाली आहे. दरम्याण मायनिंगचे शिक्षण घेतलेल्या युवकांनी आज आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत पूष्प गुच्छ देत त्यांचे आभार मानले आहे. यावेळी मायनिंग कम्युनिटीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
चंद्रपूरात अनेक कोळशाच्या खाणी आहेत. त्यामूळे या खाणींमध्ये नौकरी मिळेल या आशाने युवकांनी मायनिंग क्षेत्रातील महागडे शिक्षण घेतले. मात्र २०१८ पासून वेकोलिच्या वतीने मायनिंग सरदार आणि सर्वेअर हे पदे भरण्यात आलेली नव्हती. त्यामूळे मायनिंग शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढावले होते. यात अनेकांची वयोमर्यादा वाढत असल्याने सदर नौकरी कायमची गमविण्याचे संकटही या युवकांवर ओढावले होते. वेकोलि प्रशासनाने सदर पद भरती प्रक्रिया कोलकत्ता येथे राबवून तेथील युवकांना येथे पदभार देण्याचा कट वेकोलि प्रशासनाकडून आखल्या जात होता. त्यामूळे या विरोधात ५ जानेवारी २०२१ ला आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने नागपूर येथीली वेकोलिच्या सिएमडी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मायनिंग सरदार आणि सर्वेअर पदाच्या जागा तात्काळ भरण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने करण्यात आली होती. मागणी मान्य न झाल्यास कोळसा खाण बंद पाडण्याचा ईशाराही आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने वेकोलि प्रशास
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.